सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच आले जन्माला; मुकेश अंबानी ते नारायण मूर्ती यांनी मुलं, नातवांना असे केले मालामाल

Narayan Murthy | इन्फोसिसचे चेअरमनम नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 6 महिन्यांच्या नातावाच्या नावे अब्जावधींचे शेअर्स नावे केले. त्यामुळे अगदी कमी वयात तो जगातील छोटा अब्जाधीश झाला. त्यांच्याशिवाय मुकेश अंबानी, शिव नादर, अदार पुनावाला यांनी पण मुलांच्या आणि नातवांच्या नावे संपत्ती केली.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच आले जन्माला; मुकेश अंबानी ते नारायण मूर्ती यांनी मुलं, नातवांना असे केले मालामाल
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 3:14 PM

नवी दिल्ली | 21 March 2024 : अब्जाधीशांची गोष्टच निराळी असते. त्यांची लाईफस्टाईल, कामाची पद्धत, मोठं मोठ्या डील्स हे सर्वसामान्यांपेक्षा एकदम वेगळं असतं. ते प्रत्येक गोष्टीत त्यांची छाप सोडतात. नुकतेच इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 6 महिन्यांच्या नातावाच्या नावे अब्जावधींचे शेअर केले. अगदी कमी वयात त्यांचा नातू अब्जाधीश ठरला. नारायण मूर्ती यांच्यासारखेच अनेक उद्योगपतींनी त्यांचा मुलगा, मुलगी, नातवं यांना काही ना काही गिफ्ट दिले आहे.

नारायण मूर्ती यांना अब्जावधींचे शेअर

इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी त्यांचा नातू एकाग्र याला 240 कोटी रुपये मूल्याचे 15 लाख शेअर भेट म्हणून दिले. एकाग्र हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णना यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 10 नोव्हेंबर 2023 रोजी बंगळुरुत झाला होता. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी अक्षता ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सोनक यांची पत्नी आहे. अक्षता मूर्ती हिला दोन मुली आहेत.

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी यांनी दिला 451 कोटींचा हार

श्लोका मेहता हिला नीता अंबानी यांनी महागडे गिफ्ट दिले आहे. मुलगा आकाश याची श्लोका ही पत्नी आहे. तीला नीता अंबानी यांनी मौल्यवान हार गिफ्ट केला. या हारची किंमत जवळपास 451 कोटी रुपये होती. या हारमध्ये 407.48 कॅरेट येलो डायमंड आणि 18 कॅरेटचे गोल्ड रोझ आणि 229.52 कॅरेट पांढऱ्या हिऱ्यांचा सेट आहे.

पुनावाला यांनी दिले महागडे गिफ्ट

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी मुलाला बॅटमोबाईल गिफ्ट म्हणून दिली होती. अदार पुनावाला यांनी 2015 मध्ये मुलाच्या सहाव्या वाढदिवसाला त्यांच्या मर्सिडीज बेंज एस क्लासला डिझायनर बॅटमोबाईलमध्ये बदलले होते.

शिव नाडरने 115 कोटींचे दिले घर

2014 मध्ये एचसीएलचे संस्थापक आणि चेअरमन शिव नाडर यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला, रोशनीला 115 कोटींचे घर गिफ्ट दिले. त्यावेळी दिल्लीतील ही सर्वात महागडा व्यवहार ठरला होता. हा आलिशान बंगला दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनीत आहे.

ईशा अंबानी यांना दिले गुलिटा

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने 2018 मध्ये अब्जाधीस आनंद पीरामलसोबत लग्न केले होते. या जोडीला पीरामल कुटुंबाने मुंबईत गुलिता नावाचे एक आलिशान घर भेट म्हणून दिले होते. मुंबईत, गुलिता हे मुकेश आणि नीता अंबानी यांच्या एंटालिया या आलिशान घराशेजारीच आहे. त्याची किंमत जवळपास 450 कोटी रुपये आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.