Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : भारताच्या भूमिपुत्राने रचला इतिहास! आशियातील सर्व उद्योगपतींना असे टाकले मागे

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस, वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. त्यांनी भारतीय उद्योग जगतावर मोठी छाप सोडली आहे, जाणून घेऊयात..

Mukesh Ambani : भारताच्या भूमिपुत्राने रचला इतिहास! आशियातील सर्व उद्योगपतींना असे टाकले मागे
नेटाने केला कारभार
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 10:04 AM

नवी दिल्ली : 1980 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पॉलिस्टर फिलामेंट यार्न प्रोजेक्टची पायभरणी केली. त्यात रिलायन्सने (Reliance Group) उडी घेतली. या कंपनीची निविदा मंजूर झाली. धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी मुकेश अंबानी यांना फोन करुन देशात बोलावून घेतले. त्यावेळी मुकेश अंबानी हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीएचे शिक्षण पूर्ण करत होते. शिक्षणाला राम राम ठोकून ते प्रात्यक्षिक परीक्षेत उतरले. वडिलांकडून मिळालेला वारसा आणि मूल्य जपत आज रिलायन्सचा डेरेदार वृक्ष त्यांनी उभा केला. आज मुकेश अंबानी यांचा वाढदिवस (Mukesh Ambani Birthday) आहे. आज त्यांनी देशाच्याच नाही तर आशियाच्या व्यावसायिक इतिहासावर स्वतःच्या नावे विक्रम नोंदवला आहे.

भारतात नव्हता झाला जन्म अनेक जणांना माहिती नाही की, मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात झाला नव्हता. आज 3 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात त्यांचा जन्म झाला होता. हा देश 475 कोटी लोकसंख्या असलेल्या जगात हा देश आज सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने आज 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या जनजीवनावर प्रभाव टाकला आहे.

या देशात झाला होता जन्म मुकेश अंबानी हे धीरुभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांचे सर्वात मोठे सुपूत्र आहेत. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी यमन या देशात झाला होता. त्यावेळी यमनची लोकसंख्या अवघी 50 लाख होती. तर आज या देशाची लोकसंख्या 3 कोटी 17 लाख रुपये होती. चार भावा बहिणीत मुकेश अंबानी मोठे आहेत.

हे सुद्धा वाचा

शैक्षणिक प्रवास मुकेश अंबानी यांनी घरात व्यावसायिक वातावरण असताना, सूख पायाशी लोळण घेत असतानाही शिक्षणाची कास सोडली नाही. मुकेश अंबानी यांनी Institute of Chemical Technology Mumbai मधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर Stanford University मधून एमबीए केले आहे. 1980 मध्ये रिलायन्सची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना भारतात परतावं लागलं. त्यांना एमबीए पूर्ण करता आले नाही.

रचला इतिहास 2002 मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर मुकेश अंबानी यांनी व्यावसायाची सूत्र हाती घेतली. 2004 मध्ये मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात वाटे हिस्से झाले. त्यानंतर त्यांनी वडिलांची ऑईल आणि व केमिकल व्यवसाय पुढे दामटला. या व्यवसायाने त्यांना भारतातच नाही तर आशियात नावारुपाला आणले. सध्या ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 82 अब्ज डॉलर आहे. ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत, ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. त्यांनी हा इतिहास रचला आहे. सध्या ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानी आहेत.

जिओपासून टेलिकॉम क्रांती 2016 मध्ये स्वस्तात मोबाईल फोन आणि सर्वात स्वस्त टेलिकॉम दरांनी मुकेश अंबानी यांनी भारतात धुमाकूळ घातला. त्यानंतर त्यांनी स्वस्तात इंटरनेट डेटा देण्याचा भीम पराक्रम पण केला. आज जिओ ही जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. सध्या या कंपनीचे 40 कोटींहून अधिक सक्रीय ग्राहक आहेत. एका अंदाजानुसार, जिओचे बाजार मूल्य जवळपास 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

रिटेल सेक्टरमध्ये दम मुकेश अंबानी यांनी रिटेल सेक्टरमध्ये जम बसविला आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने बाजारात मांड ठोकली आहे. अनेक ब्रँड खरेदीचा सपाटा या कंपनीने लावला आहे. FMCG सेक्टरमध्ये या कंपनीचे पोर्टफोलिओ अत्यंत तगडे आहे. एवढेच नाही तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण अनेक प्लॅटफॉर्म रिलायन्सचे आहेत. अथवा त्यात रिलायन्सची भागीदारी आहे. आज ऑनलाईन, ऑफलाईन क्षेत्रात जिओचा मोठा दबदबा आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने आज 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या जनजीवनावर प्रभाव टाकला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.