Bisleri IPL : विक्रीची चर्चा पडली मागे, या IPL टीमशी केली मोठी डील

Bisleri IPL : बाटलीबंद पाण्याची तडाख्यात विक्री करणाऱ्या बिसलेरी कंपनी विक्रीच्या हालचाली आता मंदावल्या आहेत. आयपीएलमध्ये या टीमसोबत बिसलेरीची चर्चा रंगली आहे. कसा झाला हा बदल, नेमकं काय आहे प्रकरण..

Bisleri IPL : विक्रीची चर्चा पडली मागे, या IPL टीमशी केली मोठी डील
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:50 PM

नवी दिल्ली : बाटलीबंद पाण्याची तडाख्यात विक्री करणाऱ्या बिसलेरी (Bisleri) कंपनी विक्रीच्या हालचाली आता मंदावल्या आहेत. आयपीएलमध्ये या टीमसोबत (IPL 2023) बिसलेरीची चर्चा रंगली आहे. आयपीएलमधील टीमसोबत बिसलेरीने करार केला आहे. एक दोन महिन्यांपूर्वी बिसलेरी विक्रीची चर्चा रंगली होती. टाटा समूह ही कंपनी खरेदी करणार असल्याचे समोर आले होते. बिसलेरीचे मालक रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांनी त्यांच्याकडे व्यवसाय संभाळण्यासाठी उत्ताराधिकारी नसल्याने कंपनी विक्रीची घोषणा केली होती. टाटासोबत करार जवळपास अंतिम टप्प्यात होता. पण कुठेतरी माशी शिंकली आणि विक्रीची प्रक्रिया थंडबस्त्यात पडली.

रमेश चौहान यांची एकुलती एक राजकन्या जयंती चौहान हिने बिसलेरीची कारभार हाती घेण्यास अनुत्साह दाखविल्याने कंपनीची विक्री करण्यात येत होती. पण आता जयंतीने या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तिच्याच सक्रियेतेमुळे आयपीएलच्या टीमसोबत बिसलेरीने करार केल्याचे समोर आले आहे. बिसलेरी इंटरनॅशनलच्या उपाध्यक्ष जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांच्या नेतृत्वात कंपनीने मोठी पाऊलं टाकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.

जयंती चौहान हिने आयपीएलमधील टीम दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सोबत हा करार केला. बिसलेरी आणि दिल्ली कॅपिटल्स याची भागीदार झाली. हा करार येत्या तीन वर्षांसाठी असेल. म्हणजे पुढील तीन वर्षांसाठी बिसलेरी दिल्ली कॅपिटल्सची हायड्रेशन पार्टनर असेल. यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) सोबत बिसलेरीची पार्टनरशिप होती. जयंती चौहान हिने या कराराविषयी आनंद व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

बिसलेरी हा ब्रँड जयंतीलाल चौहान (Jayantilal Chauhan) यांच्या मालकीचा आहे. त्यांनी 1984 साली सीलबंद पाण्याचा हा व्यवसाय सुरु केला होता. सध्याचे संचालक रमेश जे चौहान (Ramesh J Chauhan) यांचे वय 82 वर्ष आहे. बाटलीबंद मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरीचा दबदबा आहे. बिसलेरीचा भारतीय बाजारात 60 टक्के वाटा आहे.

बिसलेरीच्या संकेतस्थळानुसार, जयंतीलाल चौहान यांनी 1949 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणारी पारले समूहाची स्थापना केली होती. त्यांनी 1969 मध्ये इटलीतील एका उद्योजकाकडून बिसलेरी खरेदी केली होती. सध्या कंपनी हँड सॅनिटायझरही तयार करत आहे. Bisleriचे 128 हून अधिक ऑपरेशनल प्लॅँट आहेत. कंपनीचे 6000 अधिक वितरक आणि 7500 हून अधिक ट्रकसोबत नेटवर्क आहे. इतर देशातही व्यवसायाचा पसारा पसरला आहे. आता बिसलेरीने आयपीएलमधील टीम दिल्ली कॅपिटल्स सोबत व्यावसायिक करार केला आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....