500 रॉल्स रॉयस 300 फेरारी, सोन्याचं प्रायव्हेट जेट,पण नेटवर्थ अदानी-अंबानींपेक्षा कमी
घरी आलेल्या पाहुण्यांना ते आपले प्रायव्हेट प्राणी झु देखील दाखवितात. त्यात 30 बंगाल टायगर आहेत. येथे तुम्ही गप्पा मारु शकता किंवा बास्केट बॉल सारखे खेळ देखील करु शकता.
ब्रुनेइ या छोट्या देशावर साल 1984 पर्यंत ब्रिटीशांचे राज्य होते. त्यानंतर या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले आहे. या नंतर ब्रुनेइ देशात हसनल बोल्किया इब्री उमर अली सैफुद्दीन 3 यांनी सुल्तान आणि पंतप्रधान म्हणून कार्यभार हातात घेतला. 5 ऑक्टोबर, 1967 रोजी राजा पेंगिरियन अनाक दमित यांनी गादी सोडल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुल्तान ओमर अली सैफुद्दीन -3 यांनी सत्तेचा ताबा घेतला आणि ते ब्रनेईचे सुल्तान बनले. आता ते जगातील सर्वात श्रीमंत सम्राटात होते.
30 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले सुल्तान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट आहेत. तसेच अनेक वर्षे एका देशाचे सर्वोच्च पद भूषवित आहेत. हसनल बोल्कीया यांनी साल 2017 मध्ये आपल्या सत्तेचा 50 वर्षांचा काळ पूर्ण केला आहे ते क्वीन एलिझाबेथ यांच्यानंतर जगात सर्वाधिक काळ राज्य सरकारने राजे बनले आहेत. हसनल बोल्कीया यांचा जन्म 15 जुलै 1946 रोजी इस्ताना दारुसेलममध्ये झाला. त्यावेळी त्यांचे काका सुल्तान अहमद ताजुद्दीन हे राजे होते. जन्मावेळी ते दुसरे वारस होते. कारण त्यांचे वडील त्यांच्या काकानंतर राजा बनणार होते. . कारण सुल्तान हसनल बोल्कीया यानी 1967 मध्ये युनायटेड किंगडममध्ये Royal Military Academy Sandhurst येथून पदवी घेतली. त्यांचे शालेय शिक्षण मलेशियाची राजधानी क्वालालंपुर येथील विक्टोरिया इन्स्टीट्यूशन (Victoria Institution) येथून झाले होते.
ब्रुनेईच्या सुल्तानाची लक्झरीयस लाईफ
ऑगस्ट 1968 मध्ये गादीवर आल्यानंतर सुल्तानाने देशाला ASEAN आणि UN मध्ये सदस्यत्व मिळवून घेतले. या सुल्तानाची आलीशान लाईफस्टाईल आणि महागड्या खाजगी वस्तूंबद्दल जगभर ओळखले जाते. सुल्तान याला देशाला तेल आणि नॅचरल गॅस यातून प्रचंड पैसा मिळतो.
सोन्याचे महल
साल 1984 मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इस्ताना नूरूल ईमान पॅलेस हा अक्षरश: सोन्याने मढविलेला राजवाडा उभारला आहे.जगातील सर्वात महागडे निवास स्थान म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे. ही आलिशान इमारत 2 मिलियन चौरस फूटाहून अधिक मोठ्या जागेवर पसरलेली आहे. या महालाच्या घुमटाला 22 कॅरेट गोल्डपासून तयार केले आहे. GQ एका अहवालानूसार या पॅलेसची अंदाजे किंमत 2550 कोटीहून अधिक आहे.या महालात 5 स्विमिंग पूल, 257 बाथरूम आणि 1700 अधिक रुम्स आहेत. 110 गॅरेज आहेत. याव्यतिरिक्त एअर कंडीशनिंगसह 200 घोड्यांचे तबेले आहेत.
सोन्याने मढवलेले प्रायव्हेट जेट
ब्रुनेई सुल्तानाने आपल्या खाजगी वापरासाठी Boeing 747 मध्ये 3000 कोटीची गुंतवणूक केली आहे.यात सोन्याचे वॉशबेसिन बसविले असून त्याची किंमतच 120 दशलक्ष डॉलर आहे. सुल्तान बोल्कीया याने आपल्या मुलीला बर्थडे गिफ्ट म्हणून Airbus A340 विमान दिले होते असे म्हटले जाते.
ब्रुनेईच्या सुल्तानाकडे लक्झरियस कार कलेक्शन
सुल्तानाकडे सोन्याचा मुलामा दिलेली रॉल्स-रॉयस ( Rolls-Royce ) कार देखील आहे. ब्रुनेईच्या सुल्तानाकडे सुमारे 7000 वाहन वाहने असून त्याची किंमत 5 अब्ज डॉलरहून अधिक आहे. हसनल बोल्कीया यांच्या कार कलेक्शनमध्ये 300 फेरारी आणि 500 रॉल्स रॉयस आहेत. सुल्तानकडे ओपन रुफची ( Open roof ) असलेली रॉल्स रॉयस आहे .सुल्तानाच्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी ही होय केली आहे. सुल्तानाच्या घरी आलेली मंडळींना सुल्तान आपले खाजगी प्राणी संग्रहालय देखील दाखवितात. त्यात 30 बंगाल टायगर आहेत. फ्लेमिंगो, काकातुआ असे पक्षी देखील आहेत. येथे तुम्ही गप्पा मारु शकता किंवा बास्केट बॉल खेळण्यासारखे मजेदार एक्टीव्हीटी देखील करु शकता.
लंडनला केस कापायला जातात
सुल्तानाचे वय वाढले असले तरी त्याचे शौक महागडे आहेत. त्यांनी एक सिंगल हेयरकटसाठी सुमारे 20 हजार डॉलर खर्च केले होते. लंदनच्या Mayfair मध्ये Dorchester Hotel काम करणाऱ्या आपल्या ‘हेयर स्टायलिस्ट’ कडे केस सेट करायला सुल्तान ब्रुनेईहून लंडनला गेले होते. तीन वा चार आठवड्यातून एकदा ते केस कापण्यासाठी लंडनला जातात. फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणारे सुल्तान फ्लाईटवर 12000 डॉलरची रकम खर्च करतात.