मुंबई : जागतिक भांडवली बाजारात सत्राच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या सकारात्मकतेमुळे भारतीय शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 381.17 अंकाची वाढ झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सेनेक्स 47,354.71 अंकांपर्यंत पोहोचला. तर निफ्टीने 13,865 अंकांचा स्तर गाठला. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना चालू सत्रात 1.54 कोटींचा फायदा झाला आहे.
(bse nse share market live update)
मागील काही दिवसांपासून भांडवली बाजारात चढउतार पाहायला मिळत आहेत. याआधी 21 डिसेंबरला सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च स्तरावर म्हणजेच 47055.69 अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर आज सेन्सेक्स 47,354.71 अंकांचा पल्ला गाठला आहे. सत्राच्या सुरुवातीलाच बँक, ऑटो, मेटल या क्षेत्रातील उद्योगांचा निर्देशांक सकारात्मक राहिला. या सर्व हालचालींमुळे गुंतवणूकदारांना आजच्या चालू सत्रात आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 900 अब्ज डॉलर्सच्या कोव्हीड-19 मदत पॅकेजवर सही केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या भांडवली बाजारात तेजी आली. त्याचा भारतीय बाजारावरदेखील परिणाम झाला.
आजच्या चालू सत्रात मोठ्या उद्योगांच्या समभागांमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडस्ट्रिजमध्येही मोठी उलाढाल झाली असून त्यांच्या समभागातही वाढ झाली. मुंबई शेअर बजारातील मिडकॅप इंडस्ट्रिंच्या इंडेक्समध्ये 1.06 टक्क्यांनी वाढ झाली असून स्मॉलकॅप समभागांमध्येही वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात स्मॉलकॅप इंडेक्स 1.22 टक्क्यांनी वाढला.
शेअर बाजारात सुरुवातीलाच तेजी दिसून आल्यामुळे गुंतवणूकदारांनाही याचा फायदा मिळाला आहे. सत्राच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी 1.54 लाख कोटींची कमाई केली आहे. मुंबई शेअर बाजारावर नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवल 1,85,18,138.31 कोटी रुपये होते. ते आज 1,54,916.82 कोटी रुपयांनी वाढून 1,86,73,055.13 कोटी झाले आहे.
विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढलाhttps://t.co/dBU3QdetPE#crime #crimesnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
संबंधित बातम्या :
Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!
टीव्ही आणि फ्रीज आताच खरेदी करा, नव्या वर्षात ‘इतक्या’ किंमती वाढणार
घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान
(bse nse share market live update)