टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये BSNL ने वाढवले कंपन्यांचे टेन्शन; झटक्यात ग्राहकांची संख्या 60 लाखाने वाढली, मास्टरप्लॅन पण रेड्डी, यशाची कथा लिहितोय महाराष्ट्राचा हा बाहुबली

Telecom Industry BSNL : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने गेल्या दोन वर्षांत लाभाचे गणित जुळवले आहे. नफ्याचे गणित जुळताच बीएसएनएलच्या कामात मोठा बदल दिसला. कंपनीने गेल्या तिमाहीत प्रत्येक महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले. एका महिन्यात जवळपास50-60 लाख ग्राहकांची वृद्धी करण्याचा इतिहास रचला.

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये BSNL ने वाढवले कंपन्यांचे टेन्शन; झटक्यात ग्राहकांची संख्या 60 लाखाने वाढली, मास्टरप्लॅन पण रेड्डी, यशाची कथा लिहितोय महाराष्ट्राचा हा बाहुबली
बीएसएनएलचे खेला होबे
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 11:01 AM

जुलै महिन्यात खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये मोठी वाढ केली. सर्वच कंपन्यांचे कॉलिंग, डेटा प्लॅन महागले. त्यानंतर देशात बॉयकॉटची एकच लाट आली. ग्राहकांनी हॅशटॅग मोहिम राबवत बीएसएनएलकडे मोर्चा वळवला. बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये अचानक मोठी वाढ झाली. आता सरकार या सर्व बदलामुळे उत्साहित आहे. बीएसएनएलमध्ये अमुलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. आता बीएसएनएल लवकरच 5G वर येत आहे. इतकेच नाही तर लागलीच 6G सेवेची चाचपणी पण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रयोग सुरू आहे. असे जर झाले तर जगात सर्वाधिक गतीने इंटरनेट सेवा पुरवणारी बीएसएनएल ही जगातील पहिली सरकारी कंपनी ठरू शकेल. कोण लिहित आहे बीएसएनएलची ही यशोगाथा?

ग्राहकांच्या संख्येत मोठी वृद्धी

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा बदल केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात नवनवीन इतिहास रचत आहे. बीएसएनएलमध्ये मोठे बदल झाले आहेत. गेल्या तिमाहीत प्रत्येक महिन्यात ग्राहक जोडल्या गेले आहेत. बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत 60 लाखांची भर पडली आहे. भारत दूरसंचार निगम लिमिटेडची सेवा गावागावात पोहचवण्यात येत आहे आणि जे नेटवर्क आहे, त्यात सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

89 हजार कोटींचे पॅकेज

तोट्यात चालणाऱ्या बीएसएनएलमध्ये सुधारणेसाठी 4जी आणि 5जी सेवांसाठी 89,047 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. गेल्यावर्षी केंद्र सरकारने जून महिन्यात याविषयीची मंजूरी दिली होती. बीएसएनएल कर्जात डुबली होती. तर तंत्रज्ञानात पण पिछाडीवर होती. कंपनी गेल्या 12 वर्षांपासून तोट्यात चालली होती. पण गेल्या दोन वर्षात कंपनीने कात टाकली आहे. आता कंपनी 5G च नाही तर 6G साठीची तयारी करत आहे.

5G सोबतच 6G ची चर्चा

5G ची सेवा सुरु होण्याची प्रतिक्षा असतानाच आता 6G च्या चर्चेला जोर चढला आहे. 6G सेवेसाठी पण चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. 6G तंत्रज्ञानावर पण केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. आता तंत्रज्ञानमध्ये बीएसएनएल मागे राहून चालणार नाही. जगभरात 6G तंत्रज्ञान विकसीत होत असताना आपण मागे राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 5G सोबतच 6G च्या चर्चा वाढली आहे.

Non Stop LIVE Update
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.