Budget 2019 : इन्कम टॅक्स सूट, शेतकऱ्यांना 3 हजार पेन्शन, बजेटमध्ये काय असेल?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं बजेट आहे. या बजेटमध्ये मोदी सरकार मध्यमवर्गाला मोठी भेट देण्याची चिन्हं आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं बजेट आहे. या बजेटमध्ये मोदी सरकार मध्यमवर्गाला मोठी भेट देण्याची चिन्हं आहेत. आयकर (इन्कम टॅक्स) मर्यादा 2 लाख 50 हजार रुपयावरुन 3 लाखापर्यंत वाढवली जाऊ शकते. याशिवाय 5 लाखापासून 8 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकराची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. याशिवाय सरकार आणखी काही महत्त्वाच्या घोषणा आज करु शकतं.
दुसरीकडे गुंतवणुकीवरील करसूट 1.50 लाखावरुन 2 लाखापर्यंत वाढू शकते. गृहकर्जावर मिळणारी टॅक्समधील सूट 2 लाखावरुन 2.50 लाख होऊ शकते.
याशिवाय वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार भेट देऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे कमी जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर 3 हजार रुपये पेन्शन देण्याच्या योजनेबाबत सरकार विशेष निधीची घोषणा करु शकतं. जलसंधारण आणि सिंचन योजना सरकारच्या रडारवर असतील.
इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये मेक इन इंडियाला चालना मिळू शकते. स्थानिक उत्पादने, लघुउद्योगांना गुड न्यूज मिळू शकते.
पियुष गोयल यांनी सादर केलेलं बजेट
यापूर्वी अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने बजेटच्या माध्यमातून मास्टरस्ट्रोक मारला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये (Interim Budget 2019) 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. तसंच शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये, असंघटीत कामगारांना बोनस, माजी सैनिकांच्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ असे बजेट बाऊन्सर टाकले. हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, असं म्हणत पियुष गोयल यांनी बजेट सादर केलं होतं.
संबंधित बातम्या