Budget 2020 : इलेक्ट्रीक कारपासून सोनं-चांदीपर्यंत, काय स्वस्त; काय महाग?
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दिग्गज क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोणत्या गोष्टी महाग आणि स्वस्त होऊ शकतात याचा अंदाज वर्तवला (budget 2020 highlights) आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर (budget 2020 highlights) केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दिग्गज क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोणत्या गोष्टी महाग आणि स्वस्त होऊ शकतात याचा अंदाज वर्तवला (budget 2020 highlights) आहे.
‘या’ वस्तू महागणार
येत्या काही दिवसात फुटवेअर म्हणजेच शूज, सँडल, चप्पल यासारख्या गोष्टी महाग होणार आहेत. सर्वसामान्य बजेटमध्ये केंद्र सरकार फुटवेअरवर सीमा शुल्कात 10 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे फुटवेअरवर आधी 25 टक्के सीमा शुल्क आकारले जायचे. मात्र आता यात 10 टक्क्यांनी वाढ केल्याने 35 टक्के सीमा शुल्क आकारले जाणार आहे.
फुटवेअरसोबत फर्नीचर संबंधित उत्पादनही महाग होणार आहे. फर्नीचर किंवा त्या संबंधित इतर वस्तूंवरील सीमा शुल्क 5 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. त्यानुसार फर्नीचरच्या वस्तूंवरील सीमाशुल्क 20 टक्क्यांहून 25 टक्के आकारण्यात येणार आहे.
केंद्रीय बजेटमध्ये सिगारेट तसेच इतर तंबाखू उत्पादनावर उत्पादक शुल्क वाढवलं जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सिगारेट सोबतच इतर तंबाखू उत्पादक महाग होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान बिडीवरील शुल्क दरात कोणताही बदलाव करण्यात येणार नाही.
यासोबतच पेट्रोल-डीझेल, सोनं-चांदी, काजू, ऑटो पार्ट्स, सिंथेटिक रबर (गाड्यांचे टायर), ऑप्टिकल फायबर, स्टेनलेस प्रोडक्ट (स्टीलची भांडी), लाऊड स्पीकर, वीडियो रेकॉर्डर, मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेरा, PVC आणि टाईल्स या गोष्टी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘या’ वस्तू स्वस्त होणार
दरम्यान कापड क्षेत्राला चालना देण्यासाठी प्यूरिफाईड टेरापैथिक अॅसिड (पीटीए) वर डंपिंगरोधी शुल्क रद्द केलं आहे. तसेच वृत्तपत्रांचे कागद आणि हलक्या कोटेड पेपरवरील आयात शुल्क घटवून 10 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आलं आहे. त्याशिवाय फ्यूज, रसायन आणि प्लास्टिक यासारख्या कच्च्या मालावरील सीमा शुल्कात कपात करण्यात आली आहे.
यासोबतच साखरेसाठीचा कच्चा माल, पक्षी-प्राण्यांच्या आधारित उत्पादन, स्किम्ड दूध, काही अल्कोहलयुक्त पेय पदार्थ, सोया फायबर आणि सोया प्रोटीन यावरील सीमा शुल्क मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच इलेक्ट्रिक कार, गृह कर्ज, तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, डिटरजंट यासारखे घरगुती सामान स्वस्त होणार आहेत. त्यासोबतच पंखा, सॅनेटरी वेअर, ब्रीफ केस, बॅग, बॉटल, कंटनेर, चश्माचे फ्रेम, गादी, उशी, सूखे नारळ, अगरबत्ती, पास्ता, मेयोनीज, सॅनिटरी नॅपकिन याचाही वस्तूंचा स्वस्त गोष्टींच्या यादीत समावेश होणार आहे. त्याशिवाय चॉकलेट, वेफर्स, कस्टर्ड पाऊडर, लाइटर, ग्लासवेअर, पॉट, कुकर, प्रिंटर या गोष्टीही स्वस्त होण्याची शक्यता (budget 2020 highlights) आहे.
संबंधित बातम्या :
बजेटमधील ‘तो’ निर्णय स्तुत्य, मनसेकडून अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार
कन्फ्युजन ही कन्फ्युजन है| नवा की जुना टॅक्स स्लॅब? 5 लाखापर्यंत टॅक्स आहे की नाही?