Budget 2020 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे, सीतारमण यांच्या पोतडीतून काय मिळणार?

आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Budget 2020 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे, सीतारमण यांच्या पोतडीतून काय मिळणार?
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 10:14 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (शनिवार 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमण यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले (Budget 2020 Nirmala Sitharaman) आहेत.

संसदेत काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, आर्थिक मंदी या मुद्द्यांवरुन विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. सर्वसामान्यांकडूनही संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे बजेटमधून कोणाला दिलासा मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. याआधी जुलै महिन्यात निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.

2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून एक फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रेल्वे आणि सर्वसाधारण बजेट स्वतंत्रपणे मांडलं जात असे. परंतु आता दोन्ही बजेट एकत्रच सादर केली जातात.

Economic Survey : येत्या 5 वर्षांत चार कोटी नोकऱ्या, पगारही घसघशीत

नोकरदार, व्यावसायिक, महिलावर्ग, शेतकरी, पेन्शनधारक अशा सर्वाच वर्गाचं लक्ष आता निर्मला सीतारामण यांच्या पोतडीतून काय बाहेर पडणार, याकडे लागलं आहे. (Budget 2020 Nirmala Sitharaman)

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.