Budget 2021 | सेवानिवृत्तीनंतर ‘या’ योजनेतून मिळेल निवृत्ती वेतन, बजेटमध्ये मोठ्या तरतुदीची शक्यता..

या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

Budget 2021 | सेवानिवृत्तीनंतर ‘या’ योजनेतून मिळेल निवृत्ती वेतन, बजेटमध्ये मोठ्या तरतुदीची शक्यता..
पेन्शन फंड
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 11:16 AM

मुंबई : 2021च्या अर्थसंकल्पात, असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सरकार मोठी घोषणा करू शकते. कारण मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पातही सर्वसामान्यांसाठी विशेष योजना आणल्या होत्या. यापैकी एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना, विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना लाभदायी ठरली. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (PFRDA) आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेतील एकूण भागधारकांची संख्या 2.63 कोटींच्या पार गेली आहे (Budget 2021 Benefits of Atal Pension yojana).

सरकारच्या या पेन्शन योजनेंतर्गत 18 वर्ष ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेत समाविष्ट केले जाऊ शकते. यामध्ये, सहयोगकर्त्यांना वयाच्या 60व्या नंतर समान निश्चित पेन्शनची रक्कम किंवा भागधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदारास हमी दिलेली पेन्शन रक्कम मिळेल.

याशिवाय, समभागधारक 60 वर्षांचा होईपर्यंत एकूण जमा पेन्शन फंड नामनिर्देशित व्यक्तीला (Nominee) परत करण्याची तरतूद देखील आहे. APYचे दोन फायदे आहेत, पहिला म्हणजे भविष्यात पेन्शन आणि दुसरा आयकरमध्ये मिळणारी सूट. ही योजना 60 वर्ष वयोगटातील लोकांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची किमान हमी मासिक पेन्शन रक्कम देते.

असंघटित क्षेत्रासाठी निवृत्तीवेतन योजना

मोदी सरकारने 2015मध्ये APY अर्थात अटल पेन्शन योजना सुरू केली. ही योजना खास असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी बनवली गेली होती. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत खाते उघडता येते (Budget 2021 Benefits of Atal Pension yojana).

अटल पेन्शन योजना म्हणजे काय?

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही पेन्शन योजना आहे. या योजनेत सामील झाल्यावर वयाच्या 60 व्या वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळू शकते. यात तुम्हाला पैसे दरमहा किंवा तिमाही किंवा सहा महिन्यांच्या हप्त्यात जमा करावे लागतील आणि ते पैसे वयाच्या 60 व्या नंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळतील. यात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनांनुसार तुम्हाला हप्ते भरावे लागतील.

कर लाभ

आपण APY खात्यात जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर आपल्याला आयकर सूट मिळेत. त्यासाठी खात्यात जमा केलेल्या रकमेची पावती दाखवावी लागेल.

NPSपेक्षा वेगळे

भारत सरकारची ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) पेक्षा वेगळी आहे. एनपीएसमध्ये वयाच्या 60व्या वर्षांपर्यंत जमा केलेल्या रकमेच्या आधारावर भविष्यातील पेन्शन निश्चित केले जाते, तर APYमध्ये पेन्शन एक हजार ते 5000 रुपयांच्या दरम्यान निश्चित केले जाते. किती पेन्शन रक्कम येईल हे आपण भरत असलेल्या  प्रीमियमवर अवलंबून असेल.

(Budget 2021 Benefits of Atal Pension yojana)

हेही वाचा :

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.