Agriculture Budget 2021: मोदी सरकारनं शेती क्षेत्रासाठी खजिना उघडला? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार?

Agriculture Budget 2021: मोदी सरकारनं जाहीर केलेल्या घोषणांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का पाहावं लागणार आहे.

Agriculture Budget 2021: मोदी सरकारनं शेती क्षेत्रासाठी खजिना उघडला? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार?
निर्मला सीतारमण, अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 3:59 PM

नवी दिल्ली: Budget 2021 for Agriculture: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (FM Nirmala Sitharaman) 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. केंद्र सरकारचा या प्रयत्नाद्वारे शेतकऱ्यांचा उत्पन्न दुपप्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रानं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणांचा परिणाम काय होणार पाहावे लागणार आहे. ( Budget 2021 for Agriculture Modi Government major announcement for agriculture sector)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या भाषणात केंद्र सरकार शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जाहीर केले. निर्मला सीतारमण यांनी युपीए सरकारच्या तीनपट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं प्रत्येक क्षेत्रात डाळ, गहू, धानाची एमएसपी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली असं सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी दिल्याची माहिती दिली. 2021 मध्ये एमएसपीसाठी 75 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सीतारमण म्हणाल्या. बाजार समित्या देखील कृषी पायाभूत विकास निधीचिया कक्षेत आणल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात 5 मोठे मासेमारी हबतयार केले जाणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट वाढवण्याचं ध्येय असल्याचं सांगितले.

धानासाठी 1 लाख 72 हजार कोटींची तरतूद

निर्मला सीतारमण यांनी गहू खरेदीसाठी 75 हजार 60 कोटी, डाळ खरेदीसाठी 10 हजार 503 कोटी आणि धान खरेदीसाठी 1 लाख 72 हजार 752 कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.

मोदी सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. त्याअंतर्गत देशातील आणखी 1000 बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-एनएएम) जोडल्या जाणार आहेत. जेणेकरून शेती मालाची खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक मजबूत होऊ शकेल. याअंतर्गत शेतकरी जवळील बाजारातून आपले उत्पादन ऑनलाईन विकू शकतात. व्यापारी कुठूनही त्यांच्या उत्पादनासाठी पैसे पाठवू शकतो. या माध्यमातून मागील वर्षी 1000 बाजार समित्या जोडल्या गेल्या होत्या.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये; जाणून घ्या, PKVY योजनेबद्दल सर्व काही

Budget 2021: एलआयसीचा आयपीओ येणार तर तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार?

(Budget 2021 for Agriculture Modi Government major announcement for agriculture sector)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.