Budget 2024 | Share Market गुंतवणूकदारांना लॉटरी! Budget मध्ये या पाच गोष्टींवर लक्ष ठेवा
Budget 2024 | आगामी Budget 2024 मध्ये गुंतवणूकदारांना लॉटरी लागू शकते. त्यांना त्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल, ज्यावर केंद्र सरकार येत्या काळात अधिक सरकारी खर्च करणार आहे. या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रावर निधीची तरतूद करणार हे लक्षात ठेवल्यास चांगला परतावा मिळेल.
नवी दिल्ली | 31 January 2024 : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बजेट अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. अंतरिम बजेट सादर झाल्यानंतर केव्हापण लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे. शेअर बाजाराचे पण लक्ष या बजेटकडे लागले आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या पाच बिंदूवर तुम्ही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
- सरकारी खर्च – आगामी अंतरिम अर्थसंकल्पात सरकार कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करते. कोणत्या क्षेत्रावर अधिक सरकारी खर्च करण्यात आला, त्यावर लक्ष ठेवा. सरकार येणाऱ्या काळात कोणत्या क्षेत्रावर अधिक खर्च करेल, त्या कंपन्या कोणत्या, शेअर बाजारात त्यांची स्थिती काय हे तपासा.
- सरकारची गुंतवणूक – गुंतवणूकदारांनी बाजारात त्या सेक्टरवर फोकस करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सरकारी कंपन्या कमाल करणार आहे. केंद्र सरकार कोणत्या पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, कृषीव्यवस्था, इन्फ्रा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित कंपन्यावर लक्ष ठेवणे फायदेशीर ठरेल.
- कर सवलतीचे पाऊल – आगामी बजेटमध्ये सरकार अनेक कर सवलती देण्यासाठी नियमात काय बदल करते, काय तरतूद करते यावर लक्ष ठेवा. त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल, हे पण शोधा.
- सरकारी धोरणावर ठेवा लक्ष – गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओ विविधतापूर्ण ठेवणे आवश्यक आहे. बाजारातील प्रत्येक सेक्टरमधील चांगले रिटर्न देणाऱ्या संधीचा शोध आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. आगामी बजेटमध्ये सरकारचे धोरण काय, त्याचा बाजारावर काय परिणाम होईल यावर लक्ष ठेवा.
- लाभप्राप्त सेक्टरवर लक्ष ठेवा – आर्थिक विकास आणि गती यासाठी केंद्र सरकार अनेक सेक्टरवर लक्ष केंद्रीत करते. त्यामुळे आगामी बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रात सरकार काय धोरण राबवते. किती निधी देते याकडे लक्ष ठेवा. त्याआधारे शेअर बाजारात कोणत्या क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल, यावर लक्ष ठेवा. एफएमसीजी, कृषी, ग्रामीण विाकस आणि आरोग्य सेवेतील कंपन्यांवर लक्ष ठेवा.
हे सुद्धा वाचा