Budget 2024 | जाणून घ्या बजेटची एबीसीडी, निर्मला सीतारमण किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प
Budget 2024 | बजेट सत्र सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. बजट सत्राची सुरुवात 31 जानेवारी रोजी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त सत्राला उद्देशून भाषण करतील. त्यानंतर अर्थसंकल्प सादर होईल.
नवी दिल्ली | 27 January 2024 : केंद्रीय बजेट आता तोंडावर आले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी बजेस सादर करतील. हे अंतरिम बजेट असेल. एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यानंतर केंद्रात नवीन सरकार येईल. हे सरकार आर्थिक वर्ष 2024025 साठी पूर्ण बजेट सादर करेल. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांनी हे बजेट वोट-ऑन-अकाऊंट असेल, असे स्पष्ट केले होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आले होते. तर 5 जुलै रोजी पूर्ण बजेट सादर करण्यात आले होते.
11 वाजता सादर होईल बजेट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट 2024 सादर करतील. 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते. तेव्हापासू अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे.
संसदीय अधिवेशन 31 जानेवारीपासून – बजेट सेशनची सुरुवात 31 जानेवारीपासून होईल. बजेट सेशनचे पहिले सत्र 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. बजेट सेशनच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेला उद्देशून भाषण करतील. बजेट सत्राची सुरुवात होईल. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्व्हे सादर होईल. आर्थिक सर्व्हे संक्षिप्त असेल.
मोबाईल ऐपवर उपलब्ध – संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजट मोबाईल एपवर उपलब्ध होईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत, अँड्राईड आणि आईओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तुम्ही हे एप www.indiabudget.gov.in येथून डाऊनलोड करु शकता.
निवडणूक वर्षांत दोनदा अर्थसंकल्प – लोकसभा निवडणूक वर्षात अर्थसंकल्प दोनदा सादर करण्यात येतो. सत्ताधारी पक्ष प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतो. नवीन सरकार आले तर ते योजना, ध्येय धोरण यामध्ये बदल करते. त्यामुळे निवडणूक वर्षात फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर होते. तर नवीन सत्ताधारी पूर्ण बजेट सादर करतात.
पेपरलेस बजेट – निर्मला सीतारमण या आर्थिक वर्ष 2024-25 चे अंतरिम बजेट 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर करतील. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे बजेट महत्वाचे मानण्यात येत आहे. मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेच हे अंतरिम बजेट सुद्धा पेपरलेस असेल. कोरोना काळापासून कागदविरहीत अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आहे.