Budget 2024 | बजेटच्या तयारीला वेग; हलवा वाटप करुन केले तोंड गोड

Budget 2024 | अंतरिम बजेटची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हलवा कार्यक्रमातून त्याची पुष्टी केली. त्यानुसार आता 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे. सीतारमण या सहाव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. तर अंतरिम बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.

Budget 2024 | बजेटच्या तयारीला वेग; हलवा वाटप करुन केले तोंड गोड
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 10:51 AM

नवी दिल्ली | 25 January 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पारंपारिक हवला कार्यक्रम बुधवारी झाला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि या बजेटशी संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्र्यांनी हलव्याचे वाटप केले. तोंड गोड करुन आता अंतिम टप्प्याकडे लगबग सुरु झाली आहे. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून सर्वच वर्गाला मोठ्या अपेक्षा आहे. अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात येणार नसल्याचे संकेत मिळत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार काहीतर चमत्कार दाखवेल अशी आशा आहे.

नॉर्थ ब्लॉकमध्ये श्रम परिहार

हलवा वाटपाचा कार्यक्रम एक प्रकारे श्रम परिहार पण मानल्या जातो. अर्थखात्याशी संबंधित सर्व अधिकारी, अर्थसंकल्पाचे नियोजन करण्यासाठी अनेक दिवसांपासून डेरेदाखल असतात. त्यांना परिसराच्या बाहेर जाता येत नाही. त्यांच्यासाठी हा हलवा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. बजेटपूर्वी हा कार्यक्रम घेण्यात येतो. बजेटवर शेटवचा हात फिरविण्यापूर्वी हा श्रम परिहार करण्यात येतो. त्यानंतर अंतिम तयारीची लगबग सुरु होते. बजेटसाठी आता सात दिवस उरले आहेत.

हे सुद्धा वाचा

पेपरलेस बजेट

निर्मला सीतारमण या आर्थिक वर्ष 2024-25 चे अंतरिम बजेट 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर करतील. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे बजेट महत्वाचे मानण्यात येत आहे. मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेच हे अंतरिम बजेट सुद्धा पेपरलेस असेल. कोरोना काळापासून कागदविरहीत अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आहे.

मोबाईल ऐपवर उपलब्ध

संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजट मोबाईल एपवर उपलब्ध होईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत, अँड्राईड आणि आईओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तुम्ही हे एप www.indiabudget.gov.in येथून डाऊनलोड करु शकता.

बजेटचे भाषण येथे मिळणार

बजेटचे दस्तावेज तयार होत आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटचे भाषण वाचतील. हे भाषण नागरिकांना मोबाईल एपवर उपलब्ध होईल. तसेच संसदे टीव्ही, वृ्त्तवाहिन्यांवर हे भाषण तुम्ही थेट पाहू शकाल. त्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी बजेटची पूर्ण तयारीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी हलवा कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून संवाद साधला. हे अधिकारी अनेक दिवसांपासून जगापासून अलिप्त आहेत. त्यांना घराच्यांशी सुद्धा संपर्क साधण्याची मूभा नसते. नॉर्थ ब्लॉकमध्ये हे अधिकारी राहतात. लोकसभेत अर्थमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतरच त्यांना बाहेर येण्याची परवानगी मिळते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.