Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर पण करा बंपर कमाई, हे शेअर करतील मालामाल

Budget 2024 Share Market : 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराने धमाकेदार खेळी खेळली. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहेत. तुम्हाला असा होईल फायदा?

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर पण करा बंपर कमाई, हे शेअर करतील मालामाल
बजेटपूर्वीच या स्टॉकवर ठेवा लक्ष
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 12:02 PM

Budget 2024 चा बिगुल वाजला आहे. आता अर्थसंकल्पापूर्वी 11 व्यापारी सत्र उरलेले आहेत. अनेक जण शेअर बाजाराकडे डोळे लावून बसले आहेत. काहींना या काळात कमाईचा मोका हवा आहे. काहींना कमी कालावधीत मालामाल व्हायचं आहे. पण त्यांना कोणता स्टॉक घौडदौड करेल याविषयीचा अंदाज लावता येत नाही. त्यांच्यासाठी CNBC आवाजने या शेअरवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोणते आहेत ते शेअर?

L&T ची घौडदौड

प्रकाश गाबाचे प्रकाश दीवान यांच्या आधारे सीएनबीसी-आवाजने एलअँडटी कंपनीचा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधांवर सरकार भर देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. एलअँडटी 3500 रुपयांचा सपोर्ट करतो. हा शेअर बजेटपर्यंत 3800-4,000 रुपयांपर्यंत झेप घेण्याची शक्यता आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांक 3,919.90 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 2,420 रुपये आहे. या स्टॉकचा ट्रेडिंग वॉल्यूम 17,06,210 इतके शेअर आहे. तर मार्केट कॅप 510,653 रुपये आहे. या स्टॉकने एका आठवड्यात 2.99 टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. तर 1 महिन्यात 2.82 टक्के तर एका वर्षात 48.28 टक्के रिटर्न दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Pennar Industries शेअरचा करणार कमाल?

मार्केटस्मिथ इंडियाचे हेड इक्विटी रिसर्च मयुरेश जोशी यांच्या आधारे सीएनबीसी-आवाजने पेन्नार इंडस्ट्रीज हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये आगामी बजेटपर्यंत 20 टक्क्यांपर्यंत तेजीचे सत्र दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या शेअरची 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 191.70रुपये आहे. या शेअरने एका आठवड्यात 0.43 टक्क्यांचा पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे. तर एका महिन्यात 2.26 टक्के आणि एका वर्षात 107.83 टक्क्यांचा रिटर्न दिला. तर तीन वर्षांत हा स्टॉक 450.46 टक्के वाढला. हे दोन्ही स्टॉक बाजारात तुफान घौडदौड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.