अर्थसंकल्प 2024 : कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने बजेटमध्ये कॅन्सरवरील औषधांना स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना कॅन्सरवरील उपचारात दिलासा मिळणार आहे. तसेच कॅन्सर उपचारातील उपकरणे देखील स्वस्त होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्प 2024 : कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा, रुग्णांना मोठा दिलासा
BUDGET 2024 : NIRMALA SITARAMAN
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 1:07 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी साल 2024-25 चे बजेट सादर करताना कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे कॅन्सरवरील ही अत्यंत महागडी औषधे स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कॅन्सर औषधांना कस्टम ड्यूटीतून सुट दिली आहे. कर्करोगा सारख्या दुर्धर आजारावरील महागड्या उपचाराने सर्वसामान्यांचे कंबरडे खर्चाने मोडत असते. या त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगाच्या तीन औषधांवर सीमाशुल्क सूट आणि क्ष-किरण उपकरणांवरील BCD मध्ये बदल यांचा समावेश आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना तीन अतिरिक्त कॅन्सर वरील औषधांवरील कस्टम ड्यूटी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन औषधांवर कस्टम ड्यूटी कमी केल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कॅन्सर उपचारांची उपकरणे स्वस्त होणार

कॅन्सरवरील उपचार करणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. मेडीकल एक्स रे मशिनमध्ये बसविण्यात येणाऱ्या एक्स- रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर फेस मॅन्युफक्टरींग प्रोग्रॅम बोलस्टर डोमेस्टीक प्रोडक्शन कॅपेसिटी अंतर्गत बेसिक कस्टम ड्यूटी ( BCD ) कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवीन उपक्रमांना पाठबळ दे्ण्यासाठी केलेले आहेत. तसेच आरोग्यसेवा परवडणारी करण्यासाठी आणि सुलभ करण्याच्या केंद्र सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.