Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिना 50 हजार पगारावर किती टॅक्स? 1 लाख कमविणाऱ्यासाठी कोणती कर प्रणाली ठरणार फायद्याची

Budget 2024 : जर मासिक 50 हजार रुपये अथवा एक लाख रुपये पगार असेल तर कोणती कर प्रणाली योग्य ठरेल? जुनी कर प्रणाली की नवीन कर रचना यापैकी कोणती एक निवडावी, म्हणजे तुमचा फायदा होईल, चला तर जाणून घेऊयात...

महिना 50 हजार पगारावर किती टॅक्स? 1 लाख कमविणाऱ्यासाठी कोणती कर प्रणाली ठरणार फायद्याची
किती द्याव लागेल कर
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 5:08 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी बजेट सादर केले. त्यात कर सवलतीची माहिती दिली. कर स्लॅबमध्ये बदलाची घोषणा केली. स्टँडर्ड डिडक्शन, मानक वजावट आता 50 हजाराहून 75 हजार रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली. हा बदल नवीन कर प्रणालीसाठी लागू होईल. त्यामुळे अनेकांना अजूनही प्रश्न आहे की, त्यांचा मासिक पगार 50 हजार अथवा एक लाख रुपये पगार असेल तर त्यांना किती कर लागेल? जुनी कर प्रणाली की नवीन कर रचना यापैकी कोणती एक निवडावी, म्हणजे तुमचा फायदा होईल, चला तर जाणून घेऊयात…

सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की नवीन कर प्रणाली ही डिफॉल्ट आहे. म्हणजे एकदा ती निवडली की तर तुम्हाला जुनी कर रचना निवडता येणार नाही. नवीन कर प्रणाली लागू राहील. तुमचा पगार 50 हजार रुपये असेल तर मग चिंतेची बाब नाही, कारण तुमचा वार्षिक पगार केवळ 6 लाख रुपये आहे. तुमची गुंतवणूक वा इतर उत्पन्न त्यात ग्राह्य धरण्यात आले नाही. तुम्ही कर श्रेणीत येणार नाहीत.

1 लाख पगारासाठी कोणती कर प्रणाली योग्य?

हे सुद्धा वाचा

महिन्याला 1 लाख पगार असेल तर नवीन कर प्रणाली की जुनी कर प्रणाली योग्य राहिल, असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला एक लाख रुपयाचा पगार असेल आणि एक पण रुपया कर भरायचा नसेल तर करदात्यांना जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. त्यासाठी तुम्हाला मात्र गृहकर्ज, मेडिक्लेम पॉलिसी आणि इतर काही कर सवलतीच्या गुंतवणूक योजना माहिती असणे आवश्यक आहे.

एक लाखावर नका भरु आयकर

1. गुंतवणूक आणि रीईम्बर्समेंटवर कर सवलतीचा दावा करावा लागेल

2. कन्वेंस, एलटीए, इंटरटेनमेंट, ब्रॉडब्रँड बिल, पेट्रोल बिल, फूड कुपन्सचा वापर

3. HRA चा फायदा घेता येईल. मेट्रो शहरासाठी 50 तर निम्न शहरासाठी 40 टक्के एचआरए क्लेम करता येतो.

4. पीपीएफ, ईपीएफ, ईएलएसएस, एनएससी सारख्या गुंतवणुकीवर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाखांची कर बचत होईल.

5. नॅशनल पेमेंट सिस्टममध्ये (NPS) वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास कलम 80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपये कर सवलत मिळेल.

6. आयकर अधिनियम कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यातंर्गत 25 हजार रुपयांपर्यंत बचत होईल. पण त्यात पती,पत्नी आणि मुलांचे नाव असणे आवश्यक आहे. तर आई-वडिलांच्या आरोग्य विमा खरेदीवर 50 हजारांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळते.

7. 5 वर्षांच्या उत्पन्नावर नियम 87A अंतर्गत 12,500 रुपयांचा टॅक्स रिबेट मिळतो. त्याचा वापर केल्यास 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त होऊ शकते. पण त्यासाठी योग्य तज्ज्ञा सल्ला आवश्य घ्या.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.