Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | 1950 मध्ये किती होता आयकर, तुम्हाला माहिती आहे का?

Budget 2024 | गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये नवीन कर व्यवस्थेतंर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तर जुन्या कर व्यवस्थेत अशाप्रकारचा मोठा बदल करण्यात आलेला नाही. करासंबंधी कोणतेही निश्चित नियम नाहीत. यामध्ये सरकार वेळोवेळी बदल करते.

Budget 2024 | 1950 मध्ये किती होता आयकर, तुम्हाला माहिती आहे का?
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 9:51 AM

नवी दिल्ली | 28 January 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अंतरिम बजेट सादर करतील. पूर्ण बजेट सरकारच्या स्थापनेनंतर जुलै महिन्यात सादर होईल. बजेटपूर्वी सर्वाधिक चर्चा नोकरदार वर्गाची असते. त्यांना कर रचनेत बदल हवा असतो. महागाईने हा वर्ग सध्या बेजार झाला आहे. त्यांना मोठी कर सवलत हवी आहे. त्यांना कराची मर्यादा वाढवून हवी आहे. पगारदार वर्ग टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची मागणी करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की 1950 मध्ये किती आयकर भरावा लागत होता आणि कधीपासून कर घेण्यात येतो ते?

  1. यंदाच्या बजेटमध्ये मोठी घोषणा – गेल्यावर्षी अर्थमंत्र्यांनी नवीन कर व्यवस्थेत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केले होते. तर जुन्या कर व्यवस्थेत असा कोणताही बदल करण्यात आला नव्हता. करासंबंधी असे निश्चित नियम नाही. सरकार त्यात वेळोवेळी बदल करते. स्वातंत्र्यानंतर आयकरासंबंधी अनेक बदल पाहायला मिळाले. या बजेटमध्ये नवीन कर प्रणालीत 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर जुन्या कर रचनेतही मोठ्या बदलाची अपेक्षा आहे.
  2. 1949-50 मध्ये किती होता आयकर – स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा 1949-50 च्या बजेटमध्ये आयकर निश्चित करण्यात आला. त्यापू्र्वी 10 हजारांच्या उत्पन्नावर सर्वसामान्य नागरिकांना 4 पैसे टॅक्स द्यावा लागत होता. त्यानंतर तो कमी करण्यात आला . 10 हजारांच्या उत्पन्नावर 3 पैसे कर निश्चित करण्यात आला. तर 10 हजारांपेक्षा अधिकची कमाईवर 1.9 आना कर द्यावा लागत होता.
  3. 1500 रुपयांचे उत्पन्न होते करमुक्त – 1949-50 च्या बजेटमध्ये आयकर निश्चित करण्यात आला. 1,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. या अर्थसंकल्पात 1,501 रुपये से 5,000 रुपये उत्पन्नावर 4.69 टक्के कर आकारण्याचे धोरण होते. तर 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10.94 टक्के कर आकारण्यात येत होता.
  4. 31.25 टक्के आयकर – त्यावेळी 10,001 ते 15,000 रुपयांच्या कमाईवर 21.88 टक्के आयकर द्यावा लागत होता. 15,001 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला 31.25 टक्के आयकर द्यावा लागत होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी करासंबंधीचे नियम बदलत गेले. आता जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था आहे. कदाचित लवकरच नवीन कर व्यवस्था जुन्या कर व्यवस्थेची जागा घेईल.
  5. हे सुद्धा वाचा
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.