Budget 2024 : निर्मला सीतारमण यांच्या नावे विक्रमच विक्रम; बजेटसोबतच या रेकॉर्डची पण चर्चा, दुसरा Record तर एकदम खास

Nirmala Sitharaman : 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर करण्यात येईल. निर्मला सीतारमण आता बजेटवर अखेरचा हात फिरवत असतील. बजेट सादर करताना त्यांच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद होईल.

Budget 2024 : निर्मला सीतारमण यांच्या नावे विक्रमच विक्रम; बजेटसोबतच या रेकॉर्डची पण चर्चा, दुसरा Record तर एकदम खास
रेकॉर्डचा पण रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 3:48 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. या बजेटकडून सर्वसामान्य जनता, उद्योजक, विद्यार्थ्यांसह इतरांना मोठ्या अपेक्ष आहेत. जागतिक मंदीच्या संकेतात भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी रोजगारावर भर देणार आहे. वित्तीय तूट कमी करण्याचे आणि गेल्या दहा वर्षांत कर्जाचा वाढलेला डोलारा कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. यादरम्यानच निर्मला सीतारमण यांच्या या रेकॉर्डची पण सध्या चर्चा आहे.

सीतारमण यांचे 7 वे बजेट

निर्मला सीतारमण यांचे हे सलग 7 वे बजेट आहे. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांने सलग बजेट सादर केलेले नाही. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वी सीतारमण यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोन अंतरिम बजेट आणि चार पूर्ण बजेट सादर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सर्वात दीर्घ अर्थसंकल्पीय भाषण

2020 मध्ये निर्मला सीतारमण यांनी सर्वात दीर्घ अर्थसंकल्पीय भाषम सादर केले आहे. ते 2 तास 40 मिनिटे सुरु होते. त्या बजेटमध्ये LIC IPO आणि नवीन आयकर स्लॅबची घोषणा केली होती. 2019 मध्ये त्यांनी 2 तास 17 मिनिटांचे भाषण केले होते.

पहिले डिजिटल बजेट

कोरोना काळात 2021 मध्ये निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा कागदपत्रांऐवजी डिजिटल बजेट सादर करण्याचा नवीन पायंडा पाडला. हे बजेट पूर्णपणे डिजिटल फॉर्मेटमध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये भाषण आणि दस्तावेज दोन्ही पेपरलेस होते. निर्मला सीतारमण यांनी हे बजेट सादर करण्यासाठी ‘मेड इन इंडिया’ टॅबलेटचा वापर केला होता.

ब्रीफकेसऐवजी वही खाते

2019 मद्ये सीतारमण यांनी बजेट दस्तावेज पारंपारिक ब्रीफकेसच्या ऐवजी लाल रंगाच्या परंपरागात वही खाता स्वरुपात सादर केले. इंग्रजकालीन ब्रीफकेसची परंपरा त्यांनी इतिहासजमा केली. भारतीय पंरपरेत लाल रंगाच्या कापडात धार्मिक ग्रंथ गुंडाळण्याची पद्धत आहे.

पहिल्या महिला अर्थमंत्री

निर्मला सीतारमण या तिसऱ्यांदा अर्थमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. सीतारमण या 2019 मध्ये पहिल्यांदा महिला अर्थमंत्री झाल्या. तोपर्यंत कोणत्याही महिलेने पू्र्णवेळ हे खाते सांभाळलेले नाही. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्र्यांचा अतिरिक्त पदभार संभाळला होता. यापूर्वी त्या देशाच्या पहिल्या संरक्षण मंत्री पण राहिल्या आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.