Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | Economic Survey म्हणजे काय रे भाऊ? कळणार देशाची आर्थिक नाडी

Budget 2024 | 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील आर्थिक वर्षासाठी 2024-2025 साठी अर्थसंकल्प सादर करतील. सर्वसाधारणपणे बजेटपूर्वी एक दिवसाअगोदर केंद्र सरकार आर्थिक सर्व्हेक्षण, Economic Survey सादर करते. यामाध्यमातून बजेटची रुपरेखा समोर येते.

Budget 2024 | Economic Survey म्हणजे काय रे भाऊ? कळणार देशाची आर्थिक नाडी
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 9:54 AM

नवी दिल्ली | 31 January 2024 : 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील आर्थिक वर्षासाठी, अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे बजेट असेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे बजेट सादर होत असल्याने त्याला अंतरिम बजेट म्हणतात. निवडणुकीनंतर नवीन सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. सीतारमण यांचे हे सहावे बजेट आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 31 जानेवारी रोजी सरकार संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करेल. Economic Survey अत्यंत आवश्यक समजण्यात येतो. त्यातून बजेटविषयीची झलक पहायला मिळते आणि देशाचे आर्थिक आरोग्य समोर येते.

काय आहे Economic Survey?

1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होईल. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज संसदेसमोर देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण सादर होईल. या आर्थिक सर्व्हेक्षणात अर्थव्यवस्थेचे चित्र समोर येईल. गेल्यावर्षीच्या आर्थिक धोरणांची समीक्षा करुन हा सर्व्हे तयार करण्यात येतो. यामाध्यमातून देशाची सध्याची आर्थिक स्थिती समोर येते. अर्थव्यवस्थेविषयी ताजी स्थिती समोर येते. यामध्ये वर्षभरातील विकासाचा ट्रेंड, कोणत्या क्षेत्रात किती कमाई झाली, कोणत्या क्षेत्रात कोणत्या योजना लागू करण्यात आल्या याचा लेखाजोखा मांडण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

दोन भागात आर्थिक सर्व्हेक्षण

आर्थिक सर्व्हेक्षण हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असतो. आर्थिक सर्व्हेक्षणात सरकारची नीती, प्रमूख आर्थिक आकडेवारी, क्षेत्रानुसार आर्थिक अंदाज यांची विस्तारपूर्वक माहिती देण्यात येते. तर दुसऱ्या भागात विविध क्षेत्रातील आकडेवारी सादर करण्यात येते. त्याआधारे कोणत्या क्षेत्रात काय प्रगती साधण्यात आली आणि सध्या काही स्थिती आहे, त्याची माहिती देण्यात येते.

अंतरिम बजेटमध्ये धमाका

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतरिम बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यापूर्वीच या बजेटकडून अपेक्षा न ठेवण्याचे जाहीर केले आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करु शकते, असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. मोदी सरकार धक्कातंत्रात माहिर मानण्यात येत असल्याने सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उद्या त्याविषयीचा खुलासा होईल.

दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.