Budget 2024 | लोकसभेचा राजमार्गासाठी अर्थाचा संकल्प, रंगणार बजेट सत्र

Budget 2024 | मोदी सरकार दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करेल. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिसूचना जारी केली. संसदेचे बजेट सत्र 31 जानेवारी रोजी सुरु होईल. हे बजेट 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे बजेट भाव खावून जाणार हे नक्की.

Budget 2024 | लोकसभेचा राजमार्गासाठी अर्थाचा संकल्प, रंगणार बजेट सत्र
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 2:16 PM

नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : संसदेचे संक्षिप्त अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरु होईल. हे बजेट 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 17 व्या लोकसभेचे हे शेवटचे बजेट (Budget 2024) आहे. हे बजेट लोकसभेच्या तोंडावर सादर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट नवीन पायंडे पाडण्याची दाट शक्यता आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत पुनरागमण करण्याच्या तयारीनीशी निवडणूकीत उतरणार आहेत. त्यासाठी अंतरिम बजेट हा योग्य प्लॅटफॉर्म ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची चुणूक दिसल्याशिवाय राहणार नाही.

संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती दिली. अंतरिम बजेट सत्र 2024, 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होईल असे त्यांनी सांगितले. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होईल. तर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

हे सुद्धा वाचा

लोकसभेनंतर पूर्ण बजेट

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने शुक्रवारी संसदेचे बजेट सत्राची अधिसूचना जारी केली. यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात संभाव्य लोकसभा निवडणुका होतील. या निवडणुकीनंतर नव्याने सत्तेत येणारे सरकार पूर्ण बजेट सादर करेल. निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असतील. गेल्या काही वर्षांपासून बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. बजेटचा आपल्या खिशावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी सर्वांचेच लक्ष अर्थसंकल्पाकडे असते.

वित्त विधेयक होईल सादर

1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते. तर 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते. केंद्रीय बजेट हा सरकारच्या आर्थिक घडामोडींचा सर्वात व्यापक दस्तावेज असतो. यामध्ये महसूल, भांडवल, खर्च यांचा समावेश असतो. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लागलीच वित्त विधेयक (Finance Bill) संसदेत सादर करण्यात येते. या अर्थसंकल्पत घोषीत कराच्या नियमांमध्ये बदलाचा प्रस्तावांचा समावेश असतो.

16 जूनपर्यंत कार्यकाळ

सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी 17 व्या लोकसभेचे शेवटचे सत्र होत आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा, 10 मार्च रोजी करण्यात आली होती. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात मतदान झाले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.