Budget 2024 | हे Share सूसाट धावणार! Budget मध्ये उघडणार रेल्वेसाठी खजिना

Budget 2024 | अंतरिम बजेट आता तोंडावर येऊन ठेपले आहे. मोदी सरकारने रेल्वे बजेटची प्रथा बंद केली असली तरी रेल्वेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. देशात अनेक ठिकाणी मॉडेल रेल्वे स्टेशन उभे ठाकत आहे. तर वंदे मातरमने विमानाचा एक मोठा वर्ग स्वतःकडे खेचला आहे. त्यात या गुंतवणूकदारांची मौज होणार आहे.

Budget 2024 | हे Share सूसाट धावणार! Budget मध्ये उघडणार रेल्वेसाठी खजिना
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 1:30 PM

नवी दिल्ली | 24 January 2024 : 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर होईल. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने मतदारांना लुभावणाऱ्या योजनांचा पेटारा उघडेल, असे मानण्यात येत आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने विविध योजनांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. यंदा पण अशाच धमाक्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यंदा रेल्वेवर अधिक फोकस करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,40,000 कोटी रुपये देण्यात आले होते. या बजेटमध्ये रेल्वेच्या विकासावर 20 टक्के अधिक रक्कम खर्च होईल. त्यामुळे यंदा रेल्वेला मोठी झेप घेण्यासाठी 3 लाख कोटी रुपयांची लॉटरी लागू शकते. अशावेळी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होऊ शकतो.

रेल्वे इन्फ्रावर फोकस

मोदी सरकार रेल्वेच्या पायाभूत सोयी-सुविधांसह आधुनिकीकरणावर अधिक फोकस करत आहे. या एकाच वर्षात वंदे भारत ट्रेनने रेल्वेविषयीचे सर्व चित्रच पालटून टाकले आहे. वंदे भारतने वेळेची मोठी बचत होत असल्याने अनेक राज्यांनी तिची मागणी केली आहे. केंद्र सरकारने 500 पेक्षा जास्त ट्रेन हायटेक करण्याचा विडा उचलला आहे. यावर्षात हा बदल प्रवाशी अनुभव शकता. त्यातच बुलेट ट्रेन धावली तर भारतीय रेल्वे कात टाकल्याशिवाय राहणार नाही. अयोध्या, भोपाळ, विशाखापट्टनम, वाराणशी आणि इतर काही स्टेशन हायटेक करण्यात येत आहेत. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

मिशन झिरो

केंद्र सरकार यंदाच्या बजेटमध्ये मिशन झिरोवर लक्ष केंद्रीत करणार आहे. रेल्वेच्या अपघाताने देशाला हदरवले आहे. त्यामुळे झिरो अपघात धोरण राबविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्यासाठी बजेटमध्ये मोठ्या खर्चाची तरतूद करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरक्षेसाठी केंद्राने 11000 कोटींची तरतूद केली आहे.

या कंपन्यांना होणार फायदा

  1. गेल्या एका वर्षात रेल्वेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
  2. एका वर्षात इंडियन रेल्वे फ्रेंड्स कॉर्पोरेशनने 338 टक्के परतावा दिला
  3. IRCON ने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 228 टक्के रिटर्न दिला
  4. ओरिएंट रेल्वेने गुंतवणूकदारांना या वर्षभरात 264 टक्क्यांनी मालामाल केले
  5. रेल्वे विकास निगमने 208 टक्के परतावा दिला
  6. आयआरसीटीसीने या वर्षभरात 45 टक्क्यांचा दमदार परतावा दिला
  7. रेल्वेशी संबंधित इतर पण अनेक शेअरची घौडदौड सुरुच आहे
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.