Budget 2024 | महिलांना कर सवलतीचे गिफ्ट! बजेट 2024 मध्ये NPS वर येऊ शकतो हा फैसला

Budget 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थशास्त्रज्ञांना, जुनी पेन्शन योजना (OPS) लागू होणाची मागणी जोर धरत असताना, नवीन पेन्शन योजना (NPS) अधिक आकर्षक होईल, अशी आशा आहे. तर महिला करदात्यांना खास सवलत पण या बजेटकडून अपेक्षित आहे. काय मिळू शकते गिफ्ट या बजेटमध्ये?

Budget 2024 | महिलांना कर सवलतीचे गिफ्ट! बजेट 2024 मध्ये NPS वर येऊ शकतो हा फैसला
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 10:06 AM

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार अंतरिम बजेट सादर करण्याची शक्यता आहे. संकेतानुसार, या अर्थसंकल्पात केंद्र सरकार मतदारांना लुभावणाऱ्या घोषणा टाळतील आणि महसूलावर लक्ष केंद्रीय करतील. पण अर्थशास्त्रज्ञांच्या मते, या अर्थसंकल्पात महिला आणि पेन्शनधारकांना गिफ्ट मिळू शकते. लोकसभेच्या तोंडावर केंद्र सरकार त्यांना गिफ्ट देऊ शकते. सध्या जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याची मागणी जवळपास सर्वच राज्यात जोर धरु लागली आहे. काँग्रेस शासित राज्यात तर त्याला अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकार नवीन पेन्शन योजनेत (NPS ) अमुलाग्र बदल करुन ती अधिक आकर्षक करण्याची शक्यता आहे. महिलांना खास कर सवलत मिळण्याची शक्यता पण वर्तविण्यात येत आहे.

काय म्हणतात अर्थतज्ज्ञ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 1 फेब्रुवारी रोजी 2024-25 चे अंतरिम बजेट सादर करतील. हा त्यांचा सहावा अर्थसंकल्प आहे. झी बिझनेसच्या रिपोर्टमध्ये बेंगळुरु येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे कुलपती एन. आर. भानुमूर्ती यांनी मत मांडले आहे. त्यानुसार, या अंतरिम बजेटमध्ये सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी अगोदरच गरीब कल्याण अन्न योजनांची (PMGKAY) घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांना मिळेल दिलासा

तर अर्थतज्ज्ञ लेखा चक्रवर्ती यांच्यानुसार, महिला मतदारांवर गेल्या काही वर्षांपासून मोदी सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. महिला मतदारांचे मन वळवण्यासाठी, त्यांना कर सवलतीचे गिफ्ट देण्यात येईल. आयकर अधिनियमाच्या कलम 88सी नुसार, महिलांना वेगळी कर सवलत मिळू शकते. भारतीय लोकसंख्येत आयकर भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष करदात्यांना देण्यात येणाऱ्या कर सवलतीच्या घोषणेचा आयकर भरण्यास नाखूष असणाऱ्या वर्गावर तितका प्रभाव दिसणार नाही, असे मत चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

NPS बाबत मोठी घोषणा

गेल्या वर्षापासून अनेक राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलने करण्यात आली आहेत. हा राजकीय मुद्दा झाला आहे. राज्यांच्या निवडणुकीत पण त्याचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना अधिक आकर्षक करण्याची शक्यता आहे. त्यात अजून बदलाची अपेक्षा आहे. बजेटमध्ये याविषयीचा खुलासा होऊ शकतो.

जुन्या पेन्शन योजनेची मागणी

पंजाब, राजस्थान आणि इतर राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली होती. त्यामुळे इतर राज्यातील कर्मचारी पण या योजनेसाठी आग्रही आहेत. मोदी सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या पुनरावलोकनासाठी आणि त्यात सुधारणेसाठी अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी एप्रिलमध्ये समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल या महिन्याच्या शेवटी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.