Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या एक दिवसा अगोदर गुंतवणूकदारांना झटका, शेअर बाजाराला होते तरी काय, काय सांगतो अहवाल

Share Market Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या काळात बाजारातून कमाई करण्याची संधी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर बाजार गुंतवणूकदारांना झटका देतो. याविषयीचा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या एक दिवसा अगोदर गुंतवणूकदारांना झटका, शेअर बाजाराला होते तरी काय, काय सांगतो अहवाल
गुंतवणूक करताना असा सावध
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 9:56 AM

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, आर्थिक वर्ष 2024-25 साठी मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होतो. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने नवनवीन रेकॉर्ड करत आहे. सेन्सेक्स 80,000 च्या ऐतिहासिक उच्चांकापासून अगदी काही अंक दूर आहे. तर निफ्टी 24,000 अंकांच्या वर व्यापार करत आहे. निफ्टी पण 25,000 अंकांचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बजेट सादर होण्यापूर्वी एक मोठा खुलासा समोर येत आहे. एका अहवालानुसार, जे गुंतवणूकदार बजेट सादर होण्याच्या एक दिवस पहिले गुंतवणूक करतात, त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

बजेटच्या दिवशी कशी होती शेअर बाजाराची चाल

कॅपिटलमाईंड फायनेन्शिअल सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेड ही सेबी नोंदणीकृत पोर्टफोलिओ मॅनेजर आहे. या फर्मने गेल्या 24 वर्षांत बजेटच्या दरम्यान शेअर बाजारात काय झाले, याचा अभ्यास केला आहे. फर्मने याविषयी एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, वर्ष 2000 पासून सीएनएक्स500 (CNX500) ने 24 अर्थसंकल्पाच्या काळात -0.1 टक्के रिटर्न दिला आहे. अहवालानुसार, 1 फेब्रुवारी 2021 रोजी बजेट सादर झाले त्या दिवशी गुंतवणूकदारांना 4.1 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तर 6 जुलै 2009 रोजी सादर बजेटमध्ये सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. गुंतवणूकदारांना -5.4 असे निगेटीव्ह रिटर्न मिळाले.

हे सुद्धा वाचा

अर्थसंकल्पानंतर या बाजारात

या फर्मच्या अहवालानुसार, अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक आठवडा अगोदर आणि एक आठवड्यानंतर बाजाराची चाल सर्वांनाच धक्का देणारी असते. गुंतवणूकदार बजेटच्या दिवशी अत्यंत सावधगिरीने गुंतवणूक करतात, त्यांना त्यादिवशी बाजारात चढउतार होणार असल्याचा अंदाज असतो. या अहवालानुसार, 63 टक्के वेळा गुंतवणूकदारांना फटका बसल्याचे माहिती आहे. बजेटनंतर बाजारातील अस्थिरता संपते. त्यानंतर मुरलेले गुंतवणुकदार पुन्हा जोमाने बाजारात उतरतात. अशा काळात 62 टक्के वेळा बाजार सकारात्मक दिसल्याचा दावा आहे.

बजेटपूर्वी बाजाराचा झटका

या अहवालानुसार, जर कोणी गुंतवणूकदार अर्थसंकल्पाच्या एक दिवसापूर्वी गुंतवणूक करतो, तर 54 टक्के हीच भीती असते की त्याला एका महिन्यानंतर नकारात्मक परतावा मिळेल. त्याला नुकसान होईल. पण जर गुंतवणूकदाराने त्याचा गुंतवणुकीचा कालावधी वाढवला तर 2-3 वर्षांत त्याला फायदा होतो.

फर्मचे अनुप विजयकुमार यांच्यानुसार, बजेटपूर्वी आणि नंतर लागलीच बाजारात चढउताराचे सत्र पाहायला मिळाले आहे. बजेटच्या घोषणांआधारे गुंतवणूक टाळायला हवी, त्याऐवजी गुंतवणूकदाराचा अभ्यास, कंपनीचे फंडामेंटल आणि भविष्यातील योजना लक्षात घेणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.