Budget 2024 | आरोग्य क्षेत्रात सुविधांची नांदी! बजेटमध्ये ‘आयुष्यमान भारत’चे आरोग्य अजून सुधारणार

Budget 2024 | आरोग्य विमा क्षेत्रात क्रांती येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकार आयुष्यमान भारत आरोग्य योजनेत (PM-JAY) मोठा फेरबदल करण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, विम्याची रक्कम आता 5 लाखांहून 10 लाख करण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर योजना सुटसूटीत होईल आणि त्यातील काही अटी पण रद्द होऊ शकतात.

Budget 2024 | आरोग्य क्षेत्रात सुविधांची नांदी! बजेटमध्ये 'आयुष्यमान भारत'चे आरोग्य अजून सुधारणार
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 2:14 PM

नवी दिल्ली | 20 January 2024 : केंद्र सरकार आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेत अमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. या योजनेने देशात एका वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांना सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपचारांसाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. बजेटमध्ये केंद्र सरकार या योजनेचा विस्तार करु शकते. तसेच विम्याचे कवच, विम्याची रक्कम दुप्पट करण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत सध्या 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी बजेटमध्ये (Budget 2024) ही रक्कम 10 लाख रुपये होण्याची दाट शक्यता आहे. कँसर आणि इतर असाध्य रोगांवर उपचाराची सोय करण्यात येऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात हे गिफ्ट देऊ शकते.

PTI या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, 5 लाख रुपयांहून अधिक खर्च येणाऱ्या कँसर, अवयव प्रत्यारोपण वा इतर असाध्य रोगांच्या उपचारासाठी ही रक्कम वाढविण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची विमा रक्कम 10 लाख करण्यासाठी काम करत आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये हा बदल दिसून येऊ शकतो.

या लोकांना मिळू शकतो लाभ

हे सुद्धा वाचा

आरोग्य मंत्रालयाने, आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य विमा योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, खाण कामगार, आशा कार्यकर्त्या यांना योजनेचा थेट लाभ देण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे.

केव्हा सुरु झाली योजना

सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरु करण्यात आली होती. गरीब आणि दुर्बल घटकाला उपचार आणि आरोग्य सुविधा पुरविणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. आयुष्यमान भारत अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना, AB PM-JAY ही जगातील दुसरी सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरली आहे. सरकारी आकड्यांनुसार, सध्या 55 कोटी लोक या योजनेशी जोडण्यात आले आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी या योजनेतंर्गत 28.45 कोटी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.