Share Market Green Rally | शेअर बाजारात तेजीची बरसात! गेल्या सात दिवसांत निर्देशांक दुडूदुडू धावला

Share Market Green Rally | शेअर बाजारात तेजीची बरसात झाली. गेल्या सात सत्रात बाजारात अर्ध्यांहून अधिक शेअरने उसळी घेतली आहे.

Share Market Green Rally | शेअर बाजारात तेजीची बरसात! गेल्या सात दिवसांत निर्देशांक दुडूदुडू धावला
शेअर बाजारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 11:51 AM

Share Market Green Rally | भारतीय शेअर बाजाराने (Indian Share Market) पुन्हा एकदा मरगळ झटकली आहे. बाजारातील नैराश्याचे ढग हटून बाजारात तेजीची बरसात झाली आहे. लाल रंगातील (Red Sign) स्टॉक्सने तेजीकडे घौडदौड सुरु केली आहे. अनेक शेअर आज हिरव्या रंगात न्हाहून निघाले आहेत. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (foreign portfolio investors) पुन्हा भारतीय बाजाराकडे कूच केली आहे. तर चलनवाढीचा दर कमी (Low inflation rate) झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय शेअर निर्देशांकातील (Sensex) ही तेजी शुक्रवारच्या सत्रापर्यंत कामय होती. आज गुरुवारी 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:47 वाजता सेन्सेक्स 267.81 अंकानी म्हणजे 0.46 टक्क्यांनी वधरला आणि 58,618.34 अंकांवर पोहचला , तर निफ्टी 88.40 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वधारला आणि हा निर्देशांक 17,476.55 अंकावर पोहचला. निफ्टीतील 50 शेअर्सपैकी 39 शेअर्समध्ये आज सकाळी चांगलीच वाढ दिसून आली तर बाकीच्या शेअर्सला समाधानाकारक प्रगती दिसून आली नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीच्या बाजूने कौल लावला आहे. ही शेअर बाजारात सकारात्मक बाजू आहे. बाजाराची गती मजबूत होत असल्याचे हे चिन्ह आहे. उच्च मुल्यांकनासोबतच व्यापारातील तूट भरुन निघत असल्याचे दिसून येताच परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा शेअर बाजाराचा रस्ता धरला आहे. हे तेजीचे सत्र कायम राहिले आणि परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा ओघ सुरुच ठेवला तर बाजारात लवचिकता दिसून येईल. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी , अशी सकारात्मक सुरुवात असली तरी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

परेदशी पाहुण्यांची उत्तम कामगिरी

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या नऊ महिन्यांनंतर पुन्हा भारतीय शेअर बाजारात निव्वळ खरेदीचा सपाटा लावला आहे. जुलै महिन्यात FPI ने 4,989 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. NSDL च्या ताज्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे भारतीय बाजारपेठांकडे विदेशी गुंतवणूकदार आकृष्ट झाले असून त्यांनी विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात विशेष प्रगती दिसून आली. 22 जुलै नंतर ही प्रगतीची रेषा अधिक ठळक झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकत्रित आधारावर 7 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या आठवड्यात निर्देशांकात आतापर्यंत एकूण 3 ते 4 टक्क्यांची वाढ झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.