Indian Railways : कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा रेल्वेवर बोजा; अतिरिक्त मनुष्यबळ भरती न करण्याचा निर्णय

भारतीय रेल्वेला (Indian Railways) आता अतिरिक्त मनुष्यबळाचा भार सोसवेनासा झाला आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेमधील विविध पदांवर भरती करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसे आदेश विविध विभागांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Indian Railways : कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा रेल्वेवर बोजा; अतिरिक्त मनुष्यबळ भरती न करण्याचा निर्णय
प्रातिनिधिक छायाचित्र.Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:03 AM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला (Indian Railways) आता अतिरिक्त मनुष्यबळाचा भार सोसवेनासा झाला आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेमधील विविध पदांवर भरती करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाला कात्री लागण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस तत्रज्ञान (Technology) अधिक प्रगत होत चालले आहे. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये रेल्वे विभाग देखील मागे नाही. एक यंत्र दहा माणसांचे काम करते, याचाच अर्थ जेवढे स्वयंचलित यांत्रिकिकरण वाढणार तेवढा रोजगार (Employment) देखील कमी होणार आहे. रेल्वेमध्ये पूर्वीपेक्षा अनेक पटींनी यांत्रिकीकरण वाढले आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन देखील आता मनुष्यबळ भरतीला लगाम घालण्याची शक्यता आहे. तशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे जी पदे कालबाह्य आणि  अनावश्यक झाली आहेत, त्या पदाच्या नियुक्त्या तातडीने थांबविण्यात यााव्यात असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

देशभरात रेल्वेचे जाळे

भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे, जगातील काही मोजक्या मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो. भारतातील प्रवाशांसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अल्प उत्पन्न आणि मध्यम गटातील लोकांकडून रेल्वेचाच पर्याय निवडला जातो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लांबच्या प्रवासासाठी बसचा प्रवास तेवढा सोईचा नसतो, आणि विमानाचा प्रवास हा महाग असल्याने परवडत नाही, मात्र रेल्वेकडून प्रवाशांना अगदी अल्प खर्चात जास्तीत जास्त सुविधा दिल्या जात असल्याने लोक प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. मात्र तरी देखील आज रेल्वे तोट्यात आहे.  म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वेतील काही पदांची भरती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये  सहाय्यक आचारी, पहारेकरी, टायपिस्ट, स्वच्छता कामगार, कार्यालयीन नोंदी ठेवणारा, सुतार, पेंटर, माळी, केटरिंग सहाय्यक, सेल्समन, किचन सहाय्यक अशा विविध पदांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

साडेबारा लाखांपेक्षा अधिक कर्मचारी

प्राप्त आकडेवारीनुसार रेल्वेमध्ये 2020  पर्यंत एकूण साडेबारा लाखांच्या आसपास कर्मचारी काम करत होते, आता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या उत्पन्नातील एकूण 67 टक्के खर्च हा केवळ मनुष्यबळावर खर्च होतो. त्यामुळे आता रेल्वेने मनुष्यबळ कपातीचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या भरतीवर मर्यादा आणण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात वाहतूक ठप्प असल्याने याचा मोठा फटका हा रेल्वेला बसला आहे. त्यामुळे देखील हा निर्णय घेण्यात आला असावा असे बोलले जात आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.