Richa Kar : सांगू तरी कसं की मुलगी हा व्यवसाय करते, आईच्या प्रश्नाला मुलीने 1300 कोटींचे असे दिले ‘उत्तर’

Richa Kar Zivame : सांगू तरी कसं की मुलगी हा व्यवसाय करते. माझ्या मैत्रिणी काय म्हणतील? आईच्या या प्रश्नाला मुलीने तिच्या कष्टातून उत्तर दिलं. रिचा कर हिने या व्यवसायाच्या वेडापायी नोकरी सोडली. आज ती 1300 कोटींच्या कंपनीची मालक आहे.

Richa Kar : सांगू तरी कसं की मुलगी हा व्यवसाय करते, आईच्या प्रश्नाला मुलीने 1300 कोटींचे असे दिले 'उत्तर'
मुलीने उभारली 1300 कोटींची कंपनी
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 2:10 PM

जगात काही व्यवसायाकडे पाहण्याचा कल आणि नजर अजूनही जरा विचित्रच आहे. ते करताना समाजाची विचित्र नजर झेलावी लागते. आता तरी काळ बदलला म्हणावा लागेल. पण 12-13 वर्षांपूर्वी असं काम सुरू करणं धाडसाचं म्हणावं लागेल. तर नोकरी सोडून मुलीच्या डोक्यात हे काय नवीन खूळ घुसलं? याचं कोडं काही आईला सुटेना. ती न राहून म्हणाली की व्यवयास वगैरे ठीक आहे, पण माझी मुलगा हा व्यवसाय करते हे मी मैत्रिणींना सांगू तरी कशी? त्यावर एक हास्याची झलक देत या मुलीने या एका तपात 1300 कोटी रुपयांची कंपनीच उत्तरादाखल उभी करून दाखवली. कोण आहेत रिचा कर? काय आहे त्यांचा व्यवसाय?

आजही दुकानात गेल्यावर महिलांना ब्रा आणि पँटी खरेदी करायला थोडं दडपण आल्यासारखं होतं. त्यातच दुकानदार पुरूष असला तर त्याला पण थोडं दडपण आल्यासारखं होते. नेमका हाच धागा पकडून रिचा कर यांनी दहा-बारा वर्षांपूर्वी महिलांच्या इनरविअरचा व्यवसाय सुरू करण्याचं मनाशी पक्कं केलं. त्यासाठी त्यांनी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला. Zivame, जिवामे असे त्याला नाव दिलं. आज हा ब्रँड महिला वर्गात लोकप्रिय आहे.

कुटुंबाचा विरोध, मित्रांनी उडवली टिंगल

हे सुद्धा वाचा

तर रिचा यांना असा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिला विरोध घरातूनच झाला. तर मित्रांनी पण तिची टिंगल केली. असा व्यवसाय किती दिवस टिकेल, त्यात काय प्रगती होईल आणि विशेष म्हणजे दुकानातून इनरविअर घरी आणल्यावर सुद्धा मापाबाबत महिलांची तक्रार असतेच, तेव्हा ऑनलाईन हा व्यवसाय कसा चालणार अशा एक ना एक तक्रारींचा गड रिचासमोर उभा ठाकला होता. पण तिने हार मानली नाही. तिने नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केलाच.

पण कुटुंबियासह मित्रांनी तिला पैशांची मदत मात्र केली. त्यांनी तिला उधार रक्कम दिली. तिची काही बचत होती. ती या व्यवसायासाठी तिने मोडली. घरी बसल्या बसल्या महिला त्यांच्या आवडीचे आणि विविध रंगातील आकर्षक लाँजरी खरेदी करु शकतील, असा व्यवसाय रिचाच्या डोक्यात होता. 2011 साली Zivame सुरू झाली.

1300 कोटींचा व्यवसाय

सुरुवातीला रिचा यांचा हे बिझनेस मॉडेल काही चाललं नाही. त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. पण नंतर हळूहळू या ब्रँडची चर्चा वाढली. जिवामेला पुढे रिलायन्सचं पाठबळ मिळालं. 2020 मध्ये रिलायन्स रिटेलने हा ब्रँड खरेदी केला. आज महिलांसाठीच्या या प्लॅटफॉर्मवर 5 हजारांहून अधिक लाँजरी स्टाईल, 50 हून अधिक ब्रँडस आणि 100 हून अधिक साईजचे अंतवस्त्र मिळतात. आज ही कंपनी 1300 कोटींच्या घरात आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.