गोमाता – तगडा बँक खाता, गायीच्या शेणापासून ‘असा’ कमवा बक्कळ पैसा

गायीचे शेण अनेक चांगल्या गोष्टी बनवण्यास उपयुक्त असून योग्य वापर केल्यास तगडी कमाई करता येऊ शकते

गोमाता - तगडा बँक खाता, गायीच्या शेणापासून 'असा' कमवा बक्कळ पैसा
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 8:07 AM

मुंबई : कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगली संकल्पना आणि भांडवलाची आवश्यकता असते. कमी भांडवलात चांगला नफा देणारी बिझनेस आयडिया असावी. कमी मेहनतीत तगडी कमाई करु शकणाऱ्या एका बिझनेस आयडियाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडूनही तुम्हाला सहाय्य मिळेल. (business opportunity start cow dung paper production business)

गायीच्या शेणापासून कमाई करा

गायीचे शेण अनेक चांगल्या गोष्टी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतं. शेणाचा योग्य वापर केल्यास चांगली कमाई करता येऊ शकते. गायीच्या शेणापासून कागद, पेंटही बनवले जाते. खादी ग्रामोद्योग विभागाने गायीच्या शेणापासून वैदिक पेंट (Vadic Paint) बनवले जाते. जाणून घेऊया गायीच्या शेणापासून कशी कमाई करता येईल.

गायीच्या शेणापासून कागदाचा व्यवसाय

गायीच्या शेणापासून कागद तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता. शेणापासून कागदनिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कागद बनवण्यासाठी शेणासोबतच कागदाच्या तुकड्यांचा वापर केला जातो. नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटमध्ये गायीच्या शेणापासून कागदनिर्मितीची पद्धत शोधण्यात आली. शेणापासून हँडमेड पेपर तयार केला जातो. या कागदाचा दर्जाही चांगला असतो. विशेष म्हणजे यापासून कॅरीबॅगही तयार केली जाते. प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी येत असताना कागदी पिशव्या हा चांगला पर्याय ठरत आहे.

शेणापासून कागद निर्मितीसाठी अनुदान

शेणापासून कागद बनवण्याकरिता तुम्हाला कर्ज आणि अनुदान मिळू शकेल. 5 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत तुम्ही प्लांट स्थापन करु शकता. शेणखान्यातून कागद तयार करण्याचा प्लांट उभारण्यासाठी 15 लाख रुपये खर्च येऊ शकतो. एका प्लांटमधून महिन्याभरात 1 लाख पेपर बॅग तयार करता येतात.

व्हेजिटेबल डायचा व्यवसाय

आपण शेणापासून कागदासोबतच व्हेजिटेबल डाय बनवण्याचा व्यवसायही करु शकता. म्हणजेच, आपण कागद आणि भाज्यांच्या रंगाचा व्यवसाय सहजपणे करु शकता. कागदावर प्रक्रियेसाठी शेणापासून फक्त 7 टक्के घटक वापरले जातात. उर्वरित 93 टक्के घटक भाज्यांचा डाय करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे रंग पर्यावरणासाठी अनुकूल आहेत. त्याची निर्यातही केली जाऊ शकते. (business opportunity start cow dung paper production business)

शेणापासून कंपोस्ट खत

सेंद्रिय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. सेंद्रिय शेतीत शेणखताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण शेणापासून कंपोस्ट खत बनवण्याचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. दीड ते दोन महिन्यात शेणापासून चांगले कंपोस्ट खत बनू शकते.

रंग बनवण्यासाठी गायीच्या शेणाचाही वापर केला जातो. खादी ग्रामोद्योग विभागाने शेणापासून ‘वैदिक रंग’ बनवला आहे. डिस्टेम्पर आणि इमल्शनमध्ये येणारा हा पेंट इको फ्रेंडली, बिनविषारी, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि धुता येण्यासारखा असेल, जो अवघ्या चार तासांत कोरडा होईल. जर तुम्ही गायी, म्हशी पाळल्या असतील, तर शेण विकूनही तुम्हाला पैसे मिळवता येतील.

संबंधित बातम्या :

पोस्टात फक्त 500 रुपयांत खातं उघडा; ‘या’ तीन योजनांमध्ये बँकेपेक्षा जबरदस्त फायदा

गुंतवणूकदारांसाठी नामी संधी, शेअर बाजारात ‘या’ कंपनीचा IPO खुला होणार

(business opportunity start cow dung paper production business)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.