Biparjoy Cyclone : बिपरजॉयचा जोरदार तडाखा, सर्वच व्यवसाय ठप्प, इतक्या कोटींचे झाले नुकसान

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादाळाने कहर केला. नुकसानीचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. बंदर, रेल्वे आणि विमानसेवाच प्रभावित झाली तर छोटे-मोठे अनेक व्यवसाय ठप्प झाले. विचार पण केला नाही, इतक्या कोटींचे नुकसान झाले आहे.

Biparjoy Cyclone : बिपरजॉयचा जोरदार तडाखा, सर्वच व्यवसाय ठप्प, इतक्या कोटींचे झाले नुकसान
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : यंदाच्या पहिल्या चक्रीवादळाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. बिपरजॉयचे (Biparjoy Cyclone) नुकसानीचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. बंदर, रेल्वे आणि विमानसेवाच प्रभावित झाली तर छोटे-मोठे अनेक व्यवसाय ठप्प झाले. पत्रसूचना कार्यालयाने दिलेला आकडे घाबरवणारे आहेत. गुजरातमधील 89000 घरे आणि झोपड्यांची पडझड झाली. 8600 अधिक गुरंढोरं मृत झाली. सुमारे दीड लाख हेक्टरवरील पीक नष्ट झालं आहे. मच्छिमारांच्या 475 नावा नष्ट झाल्या आहेत. केंद्र सरकारकडे गुजरात राज्याने 9800 कोटी रुपयांहून अधिकची मदत मागितली आहे, यावरुनच किती कोटींचा फटका या राज्याला बसला हे स्पष्ट होते.

रेल्वे, विमानसेवा ठप्प बिपरजॉयमुळे जवळपास 100 रेल्वे रद्द करण्यात आल्या. जामनगर एअरपोर्टवरील विमानसेवा बंद करण्यात आली. मीठागरं बंद करण्यात आली. किनारपट्टीलगतची 350 हून अधिकची कारखाने बंद कर करण्यात आली आहेत. लघु-मध्यम 6700 कारखाने, उद्योग बंद करण्यात आली. हजारो हॉटेल्स, किराणा दुकान, रस्त्यावरील हॉकर्स यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला. दोनच दिवसातील अंदाजानुसार, 500 ते 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे.

मीठागरं बंद गुजरातमधील प्रमुख व्यवसाय हा मीठ तयार करण्याचा आहे. भारताला गुजरात राज्यातूनच मीठाचा पुरवठा होतो. गुजरातमध्ये दररोज 20 लाख टनांहून अधिक मीठ तयार करण्यात येते. पण चक्रीवादळाने मीठ निर्मिती कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून लोकांच्या उदरर्निवाहचा प्रश्न उभा ठाकला आहे.

हे सुद्धा वाचा

बंदरे रिकामी करण्यात आली या चक्रीवादळाची गती अधिक असल्याने किनारपट्टी भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मच्छिमारांच्या नावा, मोठी जहाजं किनारपट्टीवर नांगर टाकून उभी करण्यात आली. हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. या भागातील सर्व व्यवहार, दळणवळण थांबविण्यात आले. किनारपट्टीवर शुकशुकाट झाला.

ऑईल रिफायनरी प्रभावित जगातील सर्वात मोठी ऑईल रिफायनरीला फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीजने या नैसर्गिक संकटामुळे गुजरातमधील सिक्का बंदरातून डिझेल आणि इतर तेल उत्पादनांच्या दळणवळणावर रोख लावली. प्रत्येक दिवशी 7,04,000 बॅरल तेल आणि तेलजन्य पदार्थांचं उत्पादन करुन ते युरोपमध्ये पाठविण्यात येते. युरोपमध्ये याच बंदरातून डिझेलची निर्यात करण्यात येते. पण ही ऑईल रिफायनरी पण प्रभावित झाली आहे.

कोणत्या वादळामुळे किती नुकसान

  1. 2019 मध्ये फानी चक्रीवादाळामुळे ओडिशाला अंदाजे 9,336.26 कोटी रुपयांचा फटका
  2. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, अम्फान चक्रीवादाळाने भारताचे जवळपास 1.16 लाख कोटींचे नुकसान
  3. पश्चिम बंगालला चक्रीवादाळामुळे अंदाजे 2.76 अब्ज डॉलरचा फटका
  4. तर याच वादामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडला एकत्रित 7 ते 8 अब्ज डॉलरचे नुकसान झाले

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.