Business: टाटा सन्स फुंकतोय एअर इंडियामध्ये प्राण, चार अब्ज डॉलर गुंतवणूक आणणार!

Business Tata Sons is breathing life into Air India will invest four billion dollars

Business: टाटा सन्स फुंकतोय एअर इंडियामध्ये प्राण, चार अब्ज डॉलर गुंतवणूक आणणार!
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:57 PM

एअर इंडियाला (Air India) चालना देण्यासाठी आणि त्याचे  कर्ज फेडण्यासाठी त्याच्या कर्ज परतफेडीसाठी टाटा सन्सने (Tata Sons) 4 अब्ज डॉलर उभारण्याची योजना आखली आहे. टाटा सन्स इक्विटी आणि हायब्रीड डेटच्या माध्यमातून निधी उभारणार आहे. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी कंपनीने मोठे आणि अधिक व्याजदराचे कर्ज घेतले होते. टाटाला त्याची परतफेड करायची आहे आणि त्याचवेळी एअर इंडियाला मजबूत करण्यासाठी नवीन भांडवल (investment) देखील उभारायचे आहे. एका  वृत्तानुसार, लाइव्ह मिंटने या प्रकरणाशी संबंधित 2 लोकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. टाटा सन्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. टाटा सन्सने 2.3 अब्ज डॉलर्सच्या एंटरप्राइझ मूल्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की कंपनीला कर्जातून भांडवल उभारणे सोपे जाईल, परंतु इक्विटी मधून भांडवल निर्माण करण्यासाठी  वेळ लागू शकतो, कारण एअरलाइन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी फंडांची संख्या कमी आहे.

गुंतवणुकीसाठी सल्लागारांची नियुक्ती

टाटा समूह लवकरच गुंतवणूक सल्लागारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, कंपनीने काही परदेशी कर्जदार आणि काही खाजगी इक्विटी फंडांशी अनौपचारिक बोलणी सुरू केली आहेत. जगभरातील एअरलाइन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या खासगी इक्विटी फंडांची संख्या तुलनेने कमी असल्याने या व्यवहाराला थोडा वेळ लागू शकतो.

हे सुद्धा वाचा
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.