iPhone 15 : एकाच शेअरमध्ये विकत घ्या 300 आयफोन 15, किंमत तरी काय

| Updated on: Sep 27, 2023 | 9:32 AM

iPhone 15 : अनेक लोकांचे Apple iPhone 15 खरेदीचे स्वप्न स्वप्नच आहे. कारण एक आयफोन घेतल्यास त्यांचे एका वर्षाचेच काय दोन-तीन वर्षाचे बजेट बिघडते. इतका महागडा स्मार्टफोन घेऊन करायचे तरी काय, असा पण एक समज आहे. पण या कंपनीचा शेअर तुमच्याकडे असता तर एक शेअर विकून तुम्हाला 300 iPhone 15 खरेदी करता आले असते.

iPhone 15 : एकाच शेअरमध्ये विकत घ्या 300 आयफोन 15, किंमत तरी काय
Follow us on

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : Apple चा iPhone 15 खरेदी करणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नाही. या स्मार्टफोनच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. इतका महागडा स्मार्टफोन खरेदी करुन करायचे तरी काय, असा पण एक समज आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणे म्हणजे दोन-तीन वर्षांचे बजेट बिघडते. त्यापेक्षा ॲप्पल कंपनीच्या शेअरमध्ये अथवा चांगल्या कंपन्यांची निवड करुन त्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेकजण देतात. पण या कंपनीचा शेअर तुमच्याकडे असता तर एक शेअर विकून तुम्हाला 300 आयफोन खरेदी करता आले असते. विश्वास बसत नाही ना? पण ही गोष्ट अगदी खरी आहे. कोणता आहे हा स्टॉक?

इतका महागडा आहे शेअर

जगात अशा पण काही कंपन्या आहेत, ज्यांचा शेअर सर्वात महाग आहे. अशाच एका कंपनीने ग्राहकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 5.45 लाख डॉलर आहे. भारतीय रुपयात जर एका शेअरची किंमत काढली तर हा भाव, 4.5 कोटी रुपये होतो. म्हणजे एका शेअरची किंमत 4.5 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

वॉरेन बफेटसोबत काय आहे कनेक्शन

बर्कशायर हॅथवे असे या कंपनीचे नाव आहे. त्याचे चेअरमन आणि सीईओ सध्या वॉरेन बफेट आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती जवळपास 120 अब्ज डॉलर आहे. ते जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून त्यांनी हे साम्राज्य उभारले आहे.

खरीदी करता येतील 300 आयफोन 15

बर्कशायर हॅथवेच्या शेअरची भारतीय रुपयातील किंमत 4.5 कोटी रुपये आहे. तर आयफोन 15 च्या Pro Max व्हर्जनची किंमत जवळपास 1.59 लाख रुपये आहे. म्हणजे आजच्या दिवशी बर्कशायर हॅथवेचा एक शेअर विकून तुम्हाला जवळपास 300 आयफोन विकत घेता येईल.

ॲप्पलचा शेअर करेल श्रीमंत

ॲप्पल कंपनीने पहिल्यांदा 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात उतरवला होता. त्यावेळी केवळ त्याचे बेसिक मॉडेलच खरेदी करता येत होते. त्यावेळी त्याची किंमत 6.3 लाख रुपये होती. तर आयफोन ऐवजी गुंतवणूकदारांनी ॲप्पलचा शेअर खरेदी केले असते, 6.3 लाख रुपये गुंतवले असते तर तुमच्या शेअरचे मूल्य 50 लाख रुपये असते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.