नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) जरी दोलनामय स्थिती असला तरी, बाजारात काही छुप्पे रुस्तम ही आहेत. त्यांच्यात योग्य ती गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्हाला भविष्यात कमाईची संधी मिळू शकते. काही शेअर छोटा, पॅकेट बडा धमाका असल्याने तुमचा जोरदार फायदा होऊ शकतो.
तर हा कमाईचा बंपर स्टॉक म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (Bharat Heavy Electricals) आहे. त्याला भेल (BHEL) असेही नाव आहे. भेल ही सरकारी कंपनी आहे. त्यात सार्वजनिक भागीदारी आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूक आज नाही तर उद्या कामी येणारच आहे. त्यात एकदमच नुकसान होण्याची वा फसगत होण्याची भीती नाही.
या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 58.7 रुपये आहे. हा शेअर लवकरच 100 रुपयांचे लक्ष्य गाठेल असा अंदाज ICICI Securities ने व्यक्त केला आहे. त्यामुळे ही कंपनी लवकरच रॉकेट भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थात गुंतवणुकीच्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायची की नाही, हा निर्णय तुम्हाला अभ्यासाअंती घ्यायचा आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ही कंपनी 1964 साली स्थापन करण्यात आली होती. ही मिडकॅप कंपनी आहे. या कंपनीचे भागभांडवल 20,683.46 कोटी रुपये आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी निर्यात आणि भंगार विक्रीतूनही मालामाल झाली आहे.
कोविड-19 काळात आणि त्यानंतर ही कंपनीने चांगली कामगिरी बजावली होती. ऊर्जा क्षेत्रात कंपनीची कामगिरी सर्वात जोरदार आहे. सध्या देशभरात वीज तुटवड्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने कोळसा आयात केला असला तरी वीज उत्पादनाची गरज पाहता कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजाप्रमाणे, 2022 आर्थिक वर्षात भेलची (BHEL) कामगिरी चांगली झाली आहे. या कंपनीच्या वार्षिक ऑर्डरमध्ये 76 टक्क्यांची वाढ झाली. आयसीआयसीआय ब्रोकरेजच्या अंदाजानुसार हा शेअर लवकरच 100 रुपयांचे लक्ष्य गाठेल. सध्या हा शेअर 60 रुपयांच्या आत आहे. हा टप्पा गाठताना शेअर 76 रुपयांचे लक्ष्य भेदेल असा अंदाज ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे.