Gold Silver Price Update : लागली ‘लॉटरी’, सोन्याचा तोरा उतरला की हो! भावात इतकी मोठी घसरण
Gold Silver Price Update : अक्षय तृतीया ग्राहकांना पावली. सोन्याचा तोरा उतरला आहे. गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक तर लागला आहे. त्यामुळे खरेदीदारांचे चेहरे खुलले आहे.
नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला अनेकांनी स्वस्तात सोने-चांदीची खरेदी केली. गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. किंमती न वाढल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. अक्षय तृतीयेला मौल्यवान धातूंसाठी अधिक रक्कम खर्च करावी लागेल, असा अंदाज फोल ठरला. गेल्या काही महिन्यापासून सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price Update) घामाटा फोडला होता. सोने घसरुन 60000 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले तर चांदीत घसरण होऊन तिचा भाव 75000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. आज तर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली.
1000 रुपयांनी स्वस्त गेल्या आठवड्यात 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा विक्री झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपयांना अगदी 50 रुपये कमी होता. गेल्या जवळपास दहा दिवसांत सोन्याला 19 एप्रिल रोजी 200 रुपयांची चढाई करता आली. इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत पडझड सुरु होती. 22 एप्रिल रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 55,900 रुपये तर 60,970 रुपये प्रति तोळा होता. एका आठवड्यात भावात एक हजारांची घसरण झाली.
शुक्रवारी काय होते भाव 24 कॅरेट सोने 425 रुपयांनी स्वस्त होऊन 60191 रुपये, 23 कॅरेट सोने 423 रुपयांनी घसरुन 59950 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 389 रुपयांनी कमी होऊन 55135 रुपये, 18 कॅरेट सोने 319 रुपयांनी स्वस्त होऊन 45143 रुपये, तर 14 कॅरेट सोने 248 रुपयांनी स्वस्त होऊन 35212 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारातील आणि जागतिक बाजारपेठेतील सोने-चांदीचा भाव हा कोणत्याही कराविना जाहीर होतो. पण देशात सोने आयात केल्यानंतर त्यामध्ये विविध कर,शुल्क यांचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे भावात तफावत दिसून येते.
आता भाव सोमवारी इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.
आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 23 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 300 रुपयांची पडझड झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,900 रुपये तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 310 रुपयांनी घसरुन भाव 60,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.