Byju’s : दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांची कपात, तर दुप्पट भरतीही, बायजूची नवी खेळी काय?

Byju's : दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांवर बायजू या स्टार्टअपने संक्रात आणली आहे. इतक्या कर्मचाऱ्यांना कंपनीने नारळ दिला आहे.

Byju's :  दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांची कपात, तर दुप्पट भरतीही, बायजूची नवी खेळी काय?
पुन्हा कर्मचाऱ्यांना नारळImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:52 PM

नवी दिल्ली : शैक्षणिक क्षेत्रातील (Education Sector) अग्रगण्य स्टॉर्टअप बाजयूने (Byju’s) पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा  (Sack Employees) निर्णय घेतला आहे. पण त्याच्या दुप्पट भरती देखील करणार आहे. मात्र सध्या दिवाळीपूर्वीच कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कपातीचाे धोरण राबविण्यात येणार आहे.  कंपनीने या सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांना शेवटचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही कंपनी सध्या आर्थिक तंगीचा सामना करत आहे. कंपनीला आर्थिक आघाडीवर अनेक झटके बसल्यानंतर तसेच काही निर्णय चुकल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. त्यासाठी कंपनीने कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉस्ट कटिंग योजनेत कंपनी मार्च 2023 पर्यंत 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, पुढील सहा महिन्यांत कंपनीला जवळपास 2,500 कर्मचारी कमी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी एकीकडे सध्याचे कर्मचारी काढत असली तरी भरती प्रक्रिया थांबविण्यात येणार नाही. कंपनी नवीन उमेदवारांना संधी देणार आहे. त्यामुळेच कंपनीच्या मनात नेमकं चालंल तरी काय असा सवाल कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बायजू कंपनीच्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी कंपनी त्यांची टीम चांगली करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कंपनी नवीन भागीदारांसह परदेशी ब्रँडला प्रमोट करणार आहे.त्यासाठी कंपनी नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे.

भारतात आणि परदेशात कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी कंपनीने कंबर कसली आहे. त्यासाठी कंपनी 10,000 शिक्षकांची भरती करणार आहे. त्यासाठी कंपनी नवीन पद्धतीने प्रमोशन कॅम्पेन राबविणार आहे.

बायजूसोबत मेरिटनेशन, ट्यूटरविस्टा, स्कॉलर आणि हैशलर्न या कंपन्या भारतात काम करणार आहेत. भारतीय शैक्षणिक विश्वात या कंपन्यांसोबत बायजू नव्या दमाने पाऊल टाकणार आहे. आकाश आणि ग्रेट लर्निंग या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहतील.

बायजू कंपनी येत्या सहा महिन्यात जेवढे कर्मचारी कमी करणार आहे. त्याच्या दुप्पट शिक्षकांची म्हणजे 5 हजार नवीन शिक्षकांची भरती करणार आहे. या शिक्षकांमध्ये इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा तज्ज्ञांचा समावेश असेल.

कंपनीचे भारतात सध्या 200 हून अधिक शैक्षणिक केंद्र आहेत. या वर्षाअखेरीस कंपनी या केंद्रांची संख्या वाढवणार आहे. कंपनीने 500 केंद्रापर्यंत ही संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.