Multibagger Stock : शेअर आहे का पैसा छापण्याचे मशीन; केवळ 11 दिवसात पैसा दुप्पट नाही तर तिप्पट

C2C Advanced Systems Share: 3 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेला सी2सी ॲडव्हान्स सिस्टिमच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. बाजारात चढउताराचे सत्र आहे. तर आज सकाळीच शेअर बाजाराने भोकाड पसरलं आहे. त्यात या शेअरने गुंतवणूकदारांचे चांगभलं केले आहे.

Multibagger Stock : शेअर आहे का पैसा छापण्याचे मशीन; केवळ 11 दिवसात पैसा दुप्पट नाही तर तिप्पट
पैसाच पैसा
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 10:56 AM

शेअर बाजारात आज हाहाकार माजला. संरक्षण उत्पादन निर्मितीमधील कंपनी सी2सी ॲडव्हान्स सिस्टिमच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. 3 डिसेंबर रोजी हा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कंपनीचा शेअर बुधवारी, 18 रोजी 10 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 845.95 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. या शेअरने NSE SME श्रेणीत 3 डिसेंबर रोजी 90 टक्क्यांसह 429.40 रुपयांवर एंट्री घेतली होती. या कंपनीच्या आयपीओ किंमतींपेक्षा सध्याची शेअरची किंमत 275 टक्के म्हणजे जवळपास तिप्पट आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 40.06 टक्क्यांची तेजी दिसून आली.

22-26 नोव्हेंबर दरम्यान आला आयपीओ

सी2सी ॲडव्हान्स सिस्टिमचा 99.07 कोटी रुपयांचा आयपीओ 22-26 नोव्हेंबर दरम्यान उघडला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पैसा ओतला होता. हा आयपीओ 125.35 पट सब्सक्राईब झाला. कंपनीच्या 99.07 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 214-226 रुपयांची प्राईस बँड आणि 600 शेअरचा लॉट निश्चित होता. या आयपीओकडून केवळ नवीन शेअर जारी करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

1407 कोटींची कंपनी

स्मॉल कॅप कंपनी केफिन टेक्नोलॉजीजचे मार्केट कॅप 1407 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची उच्चांकी भरारी 845.95 रुपये तर सर्वकालीन निच्चांक 429.40 रुपये आहे. सीटूसी ॲडव्हान्स सिस्टिम ही स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्मिती करणारी कंपनी आहे. ती इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स उपलब्ध करून देते. ही कंपनी वेळेत, रिअल टाईममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डाटा पुरवते.

मोठी झेप

या कंपनीच्या शेअरने NSE SME या विभागत 3 डिसेंबर रोजी 90 टक्क्यांसह 429.40 रुपयांवर एंट्री घेतली होती. या कंपनीच्या आयपीओ किंमतींपेक्षा सध्याची शेअरची किंमत 275 टक्के म्हणजे जवळपास तिप्पट पोहचली आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये 40.06 टक्क्यांची तेजी दिसून आली. या ताज्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचे चांगभल झालं. हा शेअर तिप्पट वधारला. त्याने गुंतवणूकदारांना मालमाल केले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.