Amazon आणि Flipkart विरोधात व्यापारी संघटना आक्रमक, उत्सव विक्री महोत्सवावर बंदीची मागणी

कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात Amazon आणि Flipkart च्या उत्सव विक्री महोत्सवावर बंदीची मागणी केली आहे (CAIT petition in Supreme court against Amazon and Flipkart CCI).

Amazon आणि Flipkart विरोधात व्यापारी संघटना आक्रमक, उत्सव विक्री महोत्सवावर बंदीची मागणी
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 11:39 PM

मुंबई : कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात Amazon आणि Flipkart च्या उत्सव विक्री महोत्सवावर बंदीची मागणी केली आहे (CAIT petition in Supreme court against Amazon and Flipkart CCI). अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड दोन्ही कंपन्या आर्थिक दहशतवादी संघटना असून ईस्ट इंडिया कंपनीचं दुसरं रुप आहे, असाही आरोप कॅटने केला आहे. कॅटने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन या दोन्ही कंपन्यांबाबतच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला देखील आव्हान दिलं आहे.

दिल्ली व्यापारी महासंघाच्या एका याचिकेवर निर्णय देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सीसीआयला अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधात चौकशी करण्यापासून रोखण्याचे अंतरिम आदेश दिले होते. यावर कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले, “सीसीआयची याचिका अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही कंपन्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी अत्यंत तार्किक आणि बहुप्रतीक्षित पाऊल आहे.”

कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले, “या कंपन्या मागील अनेक वर्षांपासून ई-कॉमर्स व्यापारात मनमर्जीपणे उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत ठेवणे, मोठ्या प्रमाणात सूट देणे, ब्रँड्ससोबत खास डील करुन इन्वेंट्रीवर नियंत्रण ठेवणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करत आहे. कॅटने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून अॅमेझॉन आणि वॉलमार्ट दोन्हींविरोधात देशभरात अभियान सुरु केलं आहे. लवकरच कॅट आगामी उत्सवाच्या काळात या कंपन्यांच्या उत्सव विक्री महोत्सवांवर बंदीची मागणी सरकारकडे करणार आहे.”

“सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे सीसीआयच्या याचिकेची दखल घेऊन दोन्ही कंपन्यांच्या चौकशीचे आदेश देईल. दुसरीकडे सरकारला देखील भारतात ई-कॉमर्स व्यापारावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी एका नियंत्रक व्यवस्थेची गरज आहे. सरकारने तात्काळ त्याची घोषणा करावी. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने भारतीय ई कॉमर्स बाजाराला विषारी बनवलं आहे. आता या कंपन्यांना व्यावसायिक व्यवहारांच्या कायद्यांतर्गत आणणे गरजेचं आहे. यानंतरही जर कुणी एफडीआयच्या धोरणाचं उल्लंघन करताना दिसत असेल तर त्यांना भारत सोडण्यास सांगावं.”

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्या आर्थिक दहशतवादी संघटना आहेत. या कंपन्या इंग्रजांच्या काळातील ब्रिटीश कंपनी इस्ट इंडियाचं दुसरं रुप आहे. सरकारने केवळ मौन धारण करुन बसायला नको, तर कायद्याच्या आधारे या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारावा.”

हेही वाचा :

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

बिग बास्केट आणि अमेझॉनला टक्कर, Flipkart आता ऑनलाईन भाज्या विकणार

Amazon चा 48 तासांसाठी बंपर सेल, ऑफरचा फायदा घेण्यासाठी ‘या’ 12 टिप्स

CAIT petition in Supreme court against Amazon and Flipkart CCI

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.