100 कोटी पगार, Ratan Tata यांचा उजवा हात, कोण आहे ही व्यक्ती?

N Chandrasekaran | टाटा समूहाने अनेक दिग्गजांना स्वातंत्र्य दिले. त्यांच्या कल्पनांना वाव दिला. या समूहाने विश्वास आणि सचोटीने नाव कमविण्यामागे अनेक चेहरे आहेत. रतन टाटा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखरन हे पण या उद्योग समूहातील मोठी आसामी. आज त्यांचे वेतन 100 कोटी रुपयांहून अधिक आहे.

100 कोटी पगार, Ratan Tata यांचा उजवा हात, कोण आहे ही व्यक्ती?
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 9:19 AM

नवी दिल्ली | 14 February 2024 : रतन टाटा यांचे अगदी जवळचे सहकारी, त्यांचे राईट हँड, एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) हे टाटा समूहाचे जबाबदारी संभाळत आहेत. गेल्या सात वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक टाटा समूहाची कमान त्यांच्या हाती आहे. रतन टाटा त्यांच्यावर विश्वास टाकतात. त्यावर ते खरे उतरले आहे. त्यांनी या समूहाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला. टाटा कंपनीने त्यांच्या नेतृत्वात 128 अब्ज डॉलरची झेप घेतली. टाटा आणि सायरस मिस्त्री वादानंतर चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे चेअरमन बनविण्यात आले होते.

100 कोटींहून अधिक पगार

चंद्रशेखरन यांच्या पत्नीचे नाव ललिता आहे. त्यांच्या मुलाचे नाव प्रणव चंद्रशेखरन आहे. एन चंद्रशेखरन यांच्याकडे आलिशान बंगला आहे. त्यांनी तो 2020 मध्ये 98 कोटी रुपयांना खरेदी केला होता. मुंबईतील पेड्डर रोडवर त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सध्या त्यांचे वेतन 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

हे सुद्धा वाचा

टाटा समूहाने घेतली मोठी झेप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्रशेखरन यांचा पगार 2019 मध्ये 65 कोटी रुपये वार्षिक इतका होता. 2021-22 मध्ये तो वाढून 109 कोटी रुपये करण्यात आला होता. या कालावधीत देशातील सर्वाधिक पगार त्यांनी घेतला. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने मोठी झेप घेतली. 2022 मध्ये त्यांनी 64,267 कोटी रुपयांपर्यंत नफा वाढवला. तर 2017 मध्ये नफ्याचा आकडा 36,728 कोटी रुपये होता. या पाच वर्षांत टाटा समूहाचा महसूल 6.37 लाख कोटी रुपयांहून वाढून 9.44 लाख कोटी रुपये इतका झाला.

प्रशिक्षणार्थी ते सीईओ

चंद्रशेखरन यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 1987 मध्ये इंटर्न म्हणून टाटा कन्सल्टेन्सीमध्ये नोकरी केली. पुढील दोन दशकात त्यांनी मेहनत आणि बुद्धिमतेची चुणूक दाखवली. त्यांना 2007 मध्ये टीसीएस बोर्डात सहभागी करुन घेण्यात आले. तसेच त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर करण्यात आले. त्यानंतर 2009 मध्ये 46 व्या वर्षी ते टीसीएसचे सीईओ झाले. ते टाटा समूहातील सर्वात तरुण सीईओ आहेत. ते फिटनेस बाबत जागरुक आहेत. त्यांनी अनेक मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉनमध्ये पण सहभाग घेतला आहे. तामिळनाडूतील एका शेतकरी कुटुंबात 1963 मध्ये त्यांचा जन्म झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.