Campus Activewear : ‘ही’ फुटवेअर बनवणारी कंपनी पुढील महिन्यात आणणार आपला IPO

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर, स्पोर्ट्स आणि इतर फुटवेअर बनवणाऱया कंपनीने आपले नेटवर्क वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनी, पुढील महिन्यात स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्याची योजना करत आहे. देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांमध्येही आपले जाळे विस्तारून आपले स्थान मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे.

Campus Activewear : ‘ही’ फुटवेअर बनवणारी कंपनी पुढील महिन्यात आणणार आपला IPO
कंपनी पुढील महिन्यात आणणार आपला IPOImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 8:04 PM

कॅम्पस ऍक्टिव्हवेअर, स्पोर्ट्स आणि इतर प्रकारच्या पादत्राणे बनवणारी कंपनी, पुढील महिन्यात शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची योजना आखत आहे. देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांमध्येही आपले नेटवर्क विस्तारून आपले स्थान मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या विस्तार योजनांचा संदर्भ देताना, कॅम्पस ऍक्टिव्हवेअरचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) रमण चावला म्हणाले की, उच्च मार्जिन महिला आणि मुलांच्या श्रेणीमध्ये नवीन उत्पादने (New products) लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. त्याच्या विस्तारासाठी, कंपनी आपल्या खास आउटलेट्सचे नेटवर्क मजबूत करेल तसेच ऑनलाइन विक्री (Online sales) वाढवण्यावर भर देईल. कॅम्पस यापुढेही ग्राहकांपर्यंत थेट (Direct to customers) पोहोचण्याची पद्धत अवलंबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2020-21 या आर्थिक वर्षातील विक्रीच्या आकड्यांवर आधारित, कॅम्पसचा दावा आहे की ब्रँडेड स्पोर्ट्स फूटवेअर उद्योगात कंपनीचा जवळपास 17 टक्के बाजार हिस्सा आहे.

महिला, मुलांसाठी नवीन उत्पादने

महिला आणि मुलांसाठी नवीन उत्पादने आणण्यावर कंपनीचा विशेष भर असेल. चावला म्हणाले की, कंपनी आपले विक्री नेटवर्क वाढवण्यासाठी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. कॅम्पसमध्ये सध्या देशभरात सुमारे 100 विशेष दुकाने आहेत. यापैकी 65 स्टोअर्स कंपनीच्या मालकीची आहेत आणि उर्वरित फ्रँचायझी मॉडेलवर आधारित आहेत.

5.1 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर

दरम्यान, बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस मे महिन्यात स्टॉक एक्स्चेंजवर देखील सूचीबद्ध करण्याचा मानस आहे. कंपनीने मागील वर्षीच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी अर्ज दाखल केला होता. दस्तऐवजानुसार, कॅम्पस अंतर्गत आय.पी.ओ 5.1 कोटी शेअर्सची ऑफर विक्रीसाठी ( OFS ) आणणार आहे. सध्याचे प्रवर्तक हरिकृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, TPG ग्रोथ – 3 SF प्रायव्हेट लिमिटेड आणि QRG एंटरप्रायझेस यांसारखे गुंतवणूकदार देखील त्यांचे होल्डिंग विकतील.

सध्या, त्याच्या प्रवर्तकांकडे कॅम्पसमध्ये 78.21 टक्के हिस्सा आहे. तर, टीपीजी ग्रोथ आणि क्यूआरजी अनुक्रमे 17.19 टक्के आणि 3.86 टक्के आहेत. उर्वरित 0.74 टक्के वैयक्तिक भागधारक आणि कर्मचारी यांच्याकडे आहेत. याशिवाय, कान्‍स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स सिस्‍टम आणि डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग सेवा क्षेत्रातील कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे वित्त उभारण्‍यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

74 वेळा नकार देऊनही नाही मानली हार… जाणून घ्या, देशातील या पहिल्या युनिकॉर्न जोडप्याची अनोखी कहाणी सारांश

देशातील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य घटले, या बलाढ्य कंपनीला सर्वाधिक फटका

घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.