तुमच्या IRCTC अकाऊंटवरून दुसऱ्याचं तिकीट बूक केल्यास होणार जेल ? IRCTCनेच केला उलगडा

ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीच्या सुलभतेमुळे, लोक स्वतःसाठी तसेच त्यांच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी त्यांचा स्वतःचा IRCTC आयडी वापरून तिकिटे बुक करतात. पण तुम्ही तुमच्या खात्यातून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास तुरुंगात जाऊ शकता का ? तुमच्याही मनात हाच प्रश्न आला का ? मग हे नक्की वाचा

तुमच्या IRCTC अकाऊंटवरून दुसऱ्याचं तिकीट बूक केल्यास होणार जेल ? IRCTCनेच केला उलगडा
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 1:32 PM

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. पण आजकाल बहतांश लोक तिकीट विकत घेण्यासाठी स्टेशनवर जात नाहीत. तर IRCTC वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा थर्ड पार्टी साइटवरून ऑनलाइन बुक करणे पसंत करतात. लोक त्यांचा स्वतःचा IRCTC आयडी वापरून स्वतःसाठी तसेच प्रसंगी त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांसाठीही तिकीट बूक करतात. पण तुम्ही तुमच्या खात्यातून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास तुरुंगात जाऊ शकता का? तुमच्याही मनात हाच प्रश्न आला आहे का ? तर यावर IRCTCचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वीच अशी अफवा पसरली होती की तुम्ही तुमच्या IRCTC खात्यातून इतरा कोणासाठी तिकीट बुक केलं तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पणआता ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे IRCTC नमूद केले आहे. अशा खोट्या बातम्या पसरवू नका , आणि त्यापासून दूर रहा, असे आवाहनही IRCTC ने लोकांना केले आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (IRCTC) साईटवर बूकिंग केले जाते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

IRCTC चे स्पष्टीकरण

खरं तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट व्हायरल होत होत्या. एखाद्या व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळे अथवा दुसरे आडनाव असलेल्या व्यक्तीकडून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून किंवा ॲपवरून तिकीट बूकिंग करून घेऊ शकत नाही, असे त्यामध्ये म्हटले होते. इतर आडनाव असलेल्या व्यक्तीकडून तिकीट बूकिंग केल्यास शिक्षा होऊ शकते, अशी अफवाही पसरली होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर IRCTC ने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली असून स्पष्टीकरण दिलं.

स्वत:च्या आयडी वरून दुसऱ्यांचं तिकीट बूक करू शकतो का ?

कोणतीही व्यक्ती आपला युजर आयडी वापरून आपले मित्र, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकते, असे त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला एक वापरकर्ता 12 तिकिटे बुक करू शकतो. जर वापरकर्त्याने आपली ओळख आधार कार्ड द्वारे पटवली असेल तर ती व्यक्ती दर महिन्याला 24 तिकिटे बुक करू शकते. केवळ आयआरसीटीसीच नाही तर भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यानेही ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे.

मात्र वैयक्तिक युजर यडीद्वारे बुक केलेली तिकिटे व्यावसायिकरित्या विकली जाऊ शकत नाहीत आणि तसे करणे गुन्हा आहे, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. कोणीही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 143 नुसार कठोर कारवाईची तरतूद आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.