Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या कॅपेक्स थीममुळे होणार हजारो कंपन्यांचा फायदा; गुंतवणूकदार होणार मालामाल, जाणून घ्या कॅपेक्स म्हणजे नेमकं काय?

कॅपेक्स म्हणजे हा असा खर्च आहे जो पूल, रस्ते, प्लॉन्ट आणि यंत्रसामग्री, उपकरणे, फर्निचर, वाहने, कार्यालयीन इमारती इत्यादी मालमत्ता निर्मितीसाठी होतो. या क्षेत्रात ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्याचा यामुळे मोठा फायदा होऊ शकतो.

केंद्राच्या कॅपेक्स थीममुळे होणार हजारो कंपन्यांचा फायदा; गुंतवणूकदार होणार मालामाल, जाणून घ्या कॅपेक्स म्हणजे नेमकं काय?
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:30 AM

मुंबईतील रंजन देसाई दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून ते खूश आहेत. सरकार 7.5 लाख कोटी रुपयांचा (capex) म्हणजेच पायाभूत सुविधांच्या (infrastructure) विकासावर खर्च करणार आहे. कॅपेक्सचे आकडे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. परंतु रंजन जास्तच खुश आहेत. त्यांनी अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले (Investment) आहेत त्यांना सरकारच्या या विक्रमी कॅपेक्सने फायदा होऊ शकतो, म्हणजेच या कंपन्यांचे शेअर्स वाढतील आणि त्याचा फायदा रंजन यांना होऊ शकतो. रंजनसारख्या अनेक गुंतवणूकदारांना बजेटच्या या कॅपेक्स थीमचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे, आतापर्यंत तुम्ही यापैकी कोणत्याही कंपनीत गुंतवणूक केली नसेल तरी काळजी करू नका. पैसे कमावण्याच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. कॅपेक्स म्हणजे हा असा खर्च आहे जो पूल, रस्ते, प्लॉन्ट आणि यंत्रसामग्री, उपकरणे, फर्निचर, वाहने, कार्यालयीन इमारती इत्यादी मालमत्ता निर्मितीसाठी होतो.

कॅपेक्सचा फायदा कोणत्या क्षेत्रातला?

कच्चा माल, सिमेंट, धातू, पोलाद, वीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांना कॅपेक्सचा फायदा होणार आहे. सगळ्यात जास्त फायदा भांडवली वस्तू क्षेत्रामध्ये L&T च्या शेअर्सना होऊ शकतो असा अंदाज ब्रोकर्सनी व्यक्त केला आहे. थर्मेक्स, सीमेन्स, एबीबी आणि बीईएमएल यांनाही मोठी ऑर्डर मिळाल्यास फायदा होऊ शकतो. नवीन रस्ते, महामार्ग आणि घरे बांधल्यानंतर सिमेंटची मागणी वाढेल. त्यामुळे दालमिया भारत, स्टार सिमेंट, एसीसी, अल्ट्राटेक या कंपन्यांच्या विक्रीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सीमेंटची जास्त विक्री झाल्याने धातू पोलादाची देखील विक्री वाढू शकते. यामुळे टाटा स्टील, एनएमडीसी, जेएसपीएल, हिंडाल्को, सेल या कंपन्यांना सोन्याचे दिवस येतील.

वीज कंपन्यांनाही फायदा

त्याचप्रमाणे 25,000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग दिलीप बिल्डकॉन, IRB इन्फ्रा, जे कुमार इन्फ्रा, IRCON इंटरनॅशनल, KNR कन्स्ट्रक्शन यांसारख्या कंपन्यांनी बांधले तर त्यांचा व्यवसायही वाढेल. तसेच नवीन कारखाने, कार्यालये, शाळा, घरांचे बांधकाम इत्यादी सुरू झाल्यामुळे विजेची मागणीही वाढणार आहे. ग्रीन एनर्जीवर मोठा खर्च करणाऱ्या अदानी ग्रीन, टाटा पॉवर, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांना याचा फायदा होईल. सरकारने कॅपेक्स वाढवल्यास दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कमाई अपेक्षीत आहे. त्यामुळे चला तर मग तुमच्या आर्थिक सल्लागाराला ताबडतोब कॉल करा आणि कॅपेक्स थीम असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सल्ला विचारा.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.