आहे कोण धीरज वधावन? 34,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ज्याला पडल्या बेड्या

Dheeraj Wadhawan Bank Scam : DHFL च्या घोटाळ्याविषयी तर तुम्हाला माहितीच असेल. कोरोनानंतर डीएचएफएलच्या संचालकांनी बँकांच्या संघटनेला चांगलाच चुना लावला होता. त्यात वधावन बंधूंचे नाव पुढे आले होते. सीबीआयने या प्रकरणात एंट्री घेतली आहे. त्यांनी धीरज वधावनला अटक केली आहे.

आहे कोण धीरज वधावन? 34,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ज्याला पडल्या बेड्या
काय आहे हा बँक घोटाळा, धीरज वधावन आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 9:20 AM

DHFL बँकेच्या 34000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. त्यात CBI ने धीरज वधावन याला अटक केली आहे. धीरज याला 13 मे रोजी मुंबईतून सीबीआयने ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी दिल्लीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. डीचीएफएलचा घोटाळा कोरोनानंतर चांगलाच गाजला होता. वधावन याला यापूर्वी यस बँकेशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो सध्या जामीनावर होता.

कोण आहे धीरज वधावन

प्रकरणात युनियन बँक ऑफ इंडियाने एक तक्रार दिली होती. त्यानुसार, डीएचएफएलच्या माध्यमातून 17 बँकांच्या संघटनेसोबत फसवणूक करण्यात आली होती. त्यावेळचे बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापक कपिल वधावन आणि संचालक धीरज वधावन हे होते. युनियन बँकेने या दोघांव्यतिरिक्त इतर पण आरोपींविरोधात तक्रार दिली होती.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

बँकांच्या संघटनेने डीएचएफएलला 2010 आणि 2018 या दरम्यान 42,871 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. पण हे कर्ज मिळवितांना वधावन भावांनी खोटे आकडेवारी सादर केलीच, पण त्यासाठीची जी कागदपत्रे सादर केली, त्यातही हेराफेरी केली. त्यांनी बँकेच्या संघटनेची फसवणूक केली. मे 2019 पासून या दोघांनी कर्जाचा हप्ता पण भरला नाही. या दोघांनी 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केली. सार्वजनिक पैसाचा गैरवापर केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी सीबीआयची कारवाई

या प्रकरणात सीबीआयने 8 मार्च, 2020 रोजी यस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर, कपिल वधावन यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन अधिनियमातंर्गत कट रचणे आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा नोंदवला. जून 2022 मध्ये सीबीआयने आतापर्यंतच्या या सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात कपिल वधावन आणि त्याचा भाऊ धीरज वधावन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कसा केला घोटाळा

सीबीआयच्या दाव्यानुसार, एप्रिल आणि जून 2018 दरम्यान, यस बँकेने डीएचएफएलच्या शॉर्ट टर्म डिबेंचरमध्ये 3,700 कोटींची गुंतवणूक केली. लागलीच वधावन बंधूंनी डीओआयटी अर्बन व्हेंचर्सला 600 कोटींचे कर्ज दिले. सीबीआयनुसार हे कर्ज नव्हे तर लाच होती. या व्हेंचर्सवर राणा कपूर याची पत्नी आणि मुलींचे नियंत्रण होते. डीएचएफएलने व्यवहार पूर्ण करण्यासाठी 40 कोटी रुपयांच्या संपत्तींच्या बदल्यात 600 कोटींचे कर्ज दिल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.