Google : गुगल गरगरलं की हो, पुन्हा ठोठावला 936 कोटींचा दंड, या कारणाने आवळले वेसण

Google : गुगलला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात पुन्हा एकदा दणका बसला आहे..

Google : गुगल गरगरलं की हो, पुन्हा ठोठावला 936 कोटींचा दंड, या कारणाने आवळले वेसण
गुगलबाबाला झटकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 8:52 PM

नवी दिल्ली : आपलं सर्वाचं लाडकं सर्च इंजिन गुगलबाबाला (Google) पुन्हा एकदा नियमांचं पालन न केल्याने दणका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) यावेळी गुगलला झटका दिला आहे. नियम धाब्यावर बसविल्याप्रकरणी गुगलला मोठा दंड (Penalty)बसविण्यात आला आहे.

CCI ने गुगलला 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्ले स्टोअर हे गुगलचे सर्वात महत्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. या प्ले स्टोअरवर सर्वप्रकारचे अॅप तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात. हे एक प्रकारे अॅपचे माहेरघर आहे.

त्याचा गैरफायदा घेत, प्ले स्टोअर धोरणांचा ( Play Store policies) गुगलने स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे समोर आले. तसेच प्रतिस्पर्धींना नुकसान होईल अशा पद्धतीने गुगलने धोरण राबविल्याचा आरोप गुगलवर होता.

हे सुद्धा वाचा

हा आरोप सिद्ध झाल्याने भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला दणका दिला आहे. प्ले स्टोअर धोरणाचा गैरवापर केल्याने आयोगाने त्यांच्यावर हा दंड ठोठावला आहे.

गुगलचा प्ले स्टोअरवर दबदबा आहे. त्याचा त्यांनी दुरुपयोग केल्याचे सीसीआयच्या लक्ष्यात आले. यापूर्वी सीसीआयने गुगलला अनुचित व्यापार प्रथेला आळा घालण्याचे निर्देश दिले होते.

या दंडानंतर गुगलला सीसीआयने पुन्हा एकदा दुरुपयोग रोखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी गुगलला एक निर्धारीत अवधीही देण्यात आला आहे. गुगलने त्यांच्या धोरणाआधारे इतर अॅपचे नुकसान होईल अशी वर्तणूक करु नये असे बजाविण्यात आले आहे.

एकाच आठवड्यात गुगलला भारतात दुसऱ्यांदा कारवाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी अॅंड्रॉईड मोबाईल उपकरणांसंबंधी बाजारातील दबदब्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आणि गुगलवर 1,337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.