स्वप्नातील घराला महागाईचे तडे; सिमेंटचे दर अव्वाच्या सव्वा होणार….

सिमेंटच्या सलग चार महिन्यात किंमतीत झालेल्या घसरणीनंतर, आता सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे किंमती वाढवणार आहेत.

स्वप्नातील घराला महागाईचे तडे; सिमेंटचे दर अव्वाच्या सव्वा होणार....
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 9:09 PM

नवी दिल्लीः सध्या अनेक क्षेत्रांना महागाईचा (inflation) जोरदार फटका बसत आहे. कारण अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायवरही झाला आहे. त्यामुळे स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना आता आणखी एक मोठा झटका बसणार आहे. कारण सिमेंट महाग (Cement is costly) होण्याची शक्यता बळावली आहे. सिमेंट कंपन्याच्या या निर्णयामुळे जनसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

सिमेंटच्या सलग चार महिन्यात किंमतीत झालेल्या घसरणीनंतर, आता सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांकडून किंमती वाढवण्याची शक्यता आहे. आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा बांधकामांना वेग येणार आहे.

पायाभूत सुविधा आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रांतून सिमेंटची जोरदार मागणी केली जाणार असल्याने त्याचा परिणाम सिंमेटच्या किंमतीवर होणार आहे.

याशिवाय चलनातील अस्थिरतेसह खर्चातही प्रचंड वाढ झाली आहे. सिमेंटची मागणी वाढण्याबरोबरच या सिमेंटचा दरही वाढवण्याचा विचार कंपन्याकडून केला जात आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजकडून सांगण्यात आले आहे की, येत्या डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सिमेंटच्या किमतीत सुमारे 6 ते 8 टक्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अल्ट्राटेक, दालमिया भारत आणि जेके सिमेंट सारख्या सिमेंट कंपन्यांची नुकताच एक बैठक झाली आहे. यामध्ये कंपन्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांच्या कमाईवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, यासह, तिन्ही कंपन्यांनी डिसेंबरपासून परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.