Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेडरल रिझर्व्हने वाढवला व्याजदर; सोन्याच्या भावात होणार घसरण तर भारतीय रुपयासह शेअर बाजारावर संकटाचे ढग

जगतिक अर्थव्यवस्था वाढत्या महागाईला काबूत ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने ही व्याजदर वाढवून महागाईवर उतारा आणला आहे. व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयाचा भारताच्या शेअर बाजारावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

फेडरल रिझर्व्हने वाढवला व्याजदर; सोन्याच्या भावात होणार घसरण तर भारतीय रुपयासह शेअर बाजारावर संकटाचे ढग
महागाईवर व्याजदराचा उताराImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:19 AM

महागाईच्या राक्षसाला वठणीवर आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने(American Fedral Reserve Bank) आणखी एक उतारा आणला आहे. महागाईला काबूत आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात (Interest rate) वाढ केली आहे. 15 जून 2022 रोजीपासून व्याजदरात 75 बेसिस पॉईंटस्(Basis points) म्हणजे 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयानंतर व्याजदरात 1.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 28 वर्षांत व्याजदराचा न हाललेला बोर्ड पहिल्यांदाच एवढा दोलनमय झाला. 75 बीपीएस पॉईंटने झालेली ही वाढ 1994 पासून पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या महागाईला(Inflation) आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानण्यात येत आहे. सध्या अमेरिका इतिहासातील सर्वात मोठया महागाईचा सामना करत आहे. 40 वर्षात अमेरिकेत एवढया महागाईला नागरिकांना तोंड द्यावे लागले नव्हते. मे महिन्यात अमेरिकेत महागाईचा दर 8.6 टक्के होता. बँकेचे संचालक जेरोम पॉवेल यांनी व्याजदराचा प्रवास इथेच थांबणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील महिन्यातही व्याजदरात वाढीचे संकेत दिले आहेत. महागाईवर उपाय योजनेसाठी मध्यवर्ती बँक जुलै महिन्यात पण व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढ करेल असे संकेत त्यांनी दिले.

जागतिक बाजारात तेजी

युएस फेडरल रिझर्व्हने 2022 मधील वृद्धी दर घटवला आहे. मार्चच्या 2.8 टक्के अंदाजापेक्षा हा अंदाज 1.7 टक्क्यांनी कमी केला आहे. अमेरिकन बँकेच्या या निर्णयानंतर जागतिक बाजारात तेजीत आला आहे. डाओ जोंसमध्ये जवळपास 300 अंकांची आणि नॅस्डॅकमध्ये 2.5 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. आशियन बाजारात ही तेजीच्या सत्राचे संकेत आहेत. एसजीएक्स निफ्टी जवळपास 180 अंकांच्या तेजीसह 15,850 रुपयांनी उघडला आहे.

हे सुद्धा वाचा

भारतावर काय होणार परिणाम?

रुपया होणार कमजोर

अमेरिकेतील आर्थिक घडामोडीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येईल. भारतीय चलनावर अर्थात रुपयावर संकटाचे ढग घोगांवत आहेत . फेडच्या व्याजदर वाढीचा निर्णयाने रुपयामध्ये आणखी घसरण दिसून येईल. रुपया 78 रुपयांच्या पुढे होता. आता या निर्णयामुळे भारतीय रुपया आणखी घसरेल अशी शक्यता आहे. बुधवारी रुपयाची घरंगळ काही केल्या थांबली नाही. चौथ्या व्यापारी सत्रात रुपया निच्चांकी स्तरावर पोहचला. डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांनी घसरला. हा दर आतापर्यंतच्या सर्वात निचांकी 78.22 टक्क्यांवर पोहचला आहे.

सोन्याच्या भावात घसरतील

रुपयासोबतच सोन्यावरही या व्याजदर वाढीचा परिणाम दिसून येईल. या निर्णयामुळे डॉलर मजबूत स्थितीत येईल. तर सोने कमकुवत होईल. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून येील. सोन्याचे दर घसरतील दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात किरकोळ 3 रुपयांची वाढ झाली. त्यासोबतच सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 50,304 रुपये राहिले.

विदेशी गुंतवणुकदारांचे पलायन

या निर्णयामुळे विदेशी संस्थांत्मक गुंतवणुकदार भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेतील. विक्रीचे सत्र जोरात सुरु राहण्याची शक्यता आहे. परिणामी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येईल. परदेशी गुंतवणुकदार यापूर्वीच भारतीय बाजारातून रक्कम काढत आहेत. आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून या परदेशी पाहुण्यांनी तब्बल 2 लाख कोटी रुपये काढले आहेत.

FDI मधून निधी जमवणे अवघड

या निर्णयाचा अनेक परिणाम होईल. त्यात भारतीय कंपन्यांसाठीही संकट वाढले आहे. भारतीय कंपन्यांना FDI च्या माध्यमातून रक्कम जमा करणे आता अवघड होणार आहे. ज्या जागतिक चलनात व्याजदर कमी असतात, अशा ठिकाणाहून जागतिक गुंतवणुकदार उधार घेतात. या निर्णयामुळे आता कर्ज महागणार आहेत.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.