Plastic Ban: हे निमंत्रण पडेल महागात, दंडासह खावी लागेल तुरुंगाची हवा, प्लास्टिक इन्विटेशन कार्डसह एकूण 19 वस्तूंवर बंदी
Single Use Plastic Ban: प्लास्टिक कोटेड निमंत्रण पत्रिकेपासून तर चमचा, स्ट्रॉ अशा एकूण 19 प्लास्टिक वस्तूंवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या वस्तुंचा वापर केल्यास दंडासह तुरुंगाची हवा ही खावी लागू शकते.
प्लास्टिक कोटेड निमंत्रण पत्रिकेपासून(Invitation Card) जरा सावध असा, नाहीतर तुमच्या आनंदावर विरजण पडलेच म्हणून समजा. एवढेच कशाला हॅपी बर्थ डे वाला केक कापताना जो चाकू (knife) वापरता तो तपासून बघा नाहीतर बर्थ डे लाच तुमचा हिरमोड होईल. एवढंच काय, रस्त्यावरच्या टपरीवर एक कट चहा पिताना ही कप काचेचा आहे ना याची खात्री करा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो केंद्र सरकारने सिंगल युझ प्लास्टिकवर बंदी (Single use plastic ban) घातली आहे. त्यात एकूण 19 वस्तुंचा(items) समावेश आहे. वापरा आणि फेका या गटातील म्हणजे सिंगल युज प्लास्टिक वस्तूंवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. यामध्ये प्लास्टिक इन्विटेशन कार्ड, प्लास्टिकचा चाकू, कप यासह इतर वस्तुंचा समावेश आहे. नव्या नियमानुसार या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
सिंगल युज प्लास्टिकमुळे प्रदुषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं सिंगल युज प्लास्टिकमुळे निर्माण होणा-या समस्या आणि प्रदुषण यावर एक एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, देशभरात रोज 26 हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी केवळ 60 टक्के कचरा गोळा करण्यात येतो. उर्वरीत कचरा हा नदी-नाल्यांमध्ये पडून राहतो. नदी-नाले मोठ्या प्रमाणात प्रदुषित होतात. देशात दरवर्षी 2.4 लाख टन सिंगल यूज प्लास्टिक तयार होते.
या वस्तुंवर घातली बंदी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिकच्या ज्या वस्तुंवर बंदी घातली आहे. त्या वस्तुंची एक मोठी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एकूण 19 वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या असून त्यांचा आपण एकदाच वापर करु शकतो. या वस्तूंच्या वापरानंतर त्या फेकून द्यावा लागतात. या वस्तूंचा वापर सातत्याने केला तर आरोग्याला अपाय तर होतोच, पण पर्यावरणाची हानी होते. यामध्ये या सिंगल युज प्लास्टिकचा समावेश करण्यात आला आहे.
75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग प्लास्टिक स्टिक ईअर बड्स फुग्यांचे प्लास्टिक स्टिक प्लास्टिक झेंडे प्लास्टिक प्लेट प्लास्टिक कप प्लास्टिक ग्लास सिगरेटचं पॅकेट आयसक्रीम व कॅंडी स्टिक थर्माकोल (पॉलिस्ट्रिन) चमचे चाकू स्ट्रॉ ट्रे मिठाईच्या डब्ब्यांवरील प्लास्टिक कागद इन्विटेशन कार्ड पीवीसी बँनर स्टिरर