Digital : डिजिटल बँकिंगचा बोलबाला! देशातील 75 जिल्ह्यांत डिजिटल सुविधा, तुम्हाला मिळणार या सुविधा..

Digital : केंद्र सरकार ग्रामीण भागातील खातेदारांसाठीही डिजिटल बँकिंगची सुविधा देत आहे..

Digital : डिजिटल बँकिंगचा बोलबाला! देशातील 75 जिल्ह्यांत डिजिटल सुविधा, तुम्हाला मिळणार या सुविधा..
ऑनलाईन बँकिंगचं युगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 7:35 PM

नवी दिल्ली : कोरोना महामारीत (Corona) अनेक लोकांनी बँकिंगचे काम ऑनलाईन (Online) करण्यालाच प्राधान्य दिले. देशात डिजिटल बँकिंग (Digital Banking) मोठ्या तेजीने लोकप्रिय होत आहे. केंद्र सरकारही Digital Banking साठी अनुकूल असून त्यासाठी सरकारी पातळीवर वेगाने घडामोडी घडत आहेत.

Digital Banking ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँकिंग युनिट्सची स्थापना केली आहे. त्यामुळे अनेक बँकांवरील कामकाजाचा ताण तर कमी होईलच पण ग्राहकांनाही तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

ग्रामीण भागातील लोकांना अद्यापही ऑनलाईनचा अनुभव नाही. एकतर फसवणुकीच्या प्रकारामुळे अनेक जण ऑनलाईन बँकिंगकडे दुर्लक्ष करतात. पण बँकेतील या युनिट्समुळे त्यांना व्यवहार करणे सोपे होईल. त्यांना ऑनलाईन बँकिंगसाठी मदतही करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन बँकिंग तुमच्या जिल्ह्यात सुरु झाल्यास, तुम्हाला काय काय फायदा होईल आणि काय सुविधा मिळतील हे पाहुयात..

कोणत्याही व्यक्तीला त्याचे बचत खाते ऑनलाईन पद्धतीने उघडता येईल. ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगच्या मार्फत खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल. ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराचा तपशील पासबुकवर प्रिंट करुन मिळेल. ग्राहक दुसऱ्या व्यक्तीला रक्कम हस्तांतरीत करु शकतील.

डिजिटल बँकिंगमुळे ग्राहकांना ऑनलाईन मुदत ठेव योजनेचे खाते उघडता येईल. ग्राहकांना कर्जासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. क्रेडिट-डेबिट कार्डसाठी त्यांना अर्ज दाखल करता येईल.

ग्राहक त्यांचा खात्याचा तपशील, स्टेटमेंटद्वारे बघू शकतो. ग्राहक वार्षिक कर ही भरु शकतो. ग्राहकाला वीज, पाणी आणि गॅसच्या बिलाची रक्कम जमा करता येईल.

या ऑनलाईन बँकिंगमुळे ग्राहकांना आता खात्यात रक्कम जमा करण्यासाठी काऊंटरवर जाण्याची गरज नाही. रोख रक्कम जमा करणाऱ्या मशीनमध्ये रक्कम जमा करता येईल. तसेच एटीएममधून रक्कम काढता येईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.