केंद्र सरकार ‘या’ कंपनीतील आपला हिस्सा विकणार, टाटा मोटर्ससह ‘या’ बड्या कंपन्या खरेदीसाठी रांगेत
मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल लिमिटेड (BEML Ltd) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीला खरेदी करण्यासठी अनेक बड्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors Ltd), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra Ltd) अशोक लेलँड लिमिटेड (Ashok Leyland Ltd), भारत फॉर्ज […]
मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱी बीईएमएल लिमिटेड (BEML Ltd) या कंपनीतील आपला हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. सरकारने हे जाहीर केल्यानंतर या कंपनीला खरेदी करण्यासठी अनेक बड्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors Ltd), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra Ltd) अशोक लेलँड लिमिटेड (Ashok Leyland Ltd), भारत फॉर्ज लिमिटेड (Bharat Forge Ltd) आणि Megha Engineering and Infrastructure Ltd या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी बीईएमएल या शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या कंपनीला खरेदी करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) फॉर्म जमा केला आहे. (central government is going to sell 26 percent stake of BEML company)
लाईव्ह मिंटने दिलेल्या माहितीप्रमाणे टाटा मोटर्स, महिंद्रा आणि अशोक लेलँडसारख्या कंपन्या BEML ला खरेदी करुन उत्पादन व्यवसायात प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वाहन उत्पादन व्यवसायावरील त्यांची निर्भरता की कमी व्हावी म्हणूसुद्धा या कंपन्या बीईएमएलला खरेदी करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
ईओआय फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून मुदत वाढ
BEML या कंपनीमध्ये सरकारची जवळपास 54 टक्के हिस्सेदारी आहे. शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या या कंपनीमधील हिसेद्दारी खरदी करण्याच्या लिलावात सहभाग नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 4 जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. त्यासाठीची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर्म जमा करण्यासाठीची शेवटची तारीख 1 मार्च होती. ती आता सरकारने वाढवून 22 मार्च केली आहे.
BEML कंपनीचे आर्थिक स्थिती काय?
BEML ही कंपनी पृथ्वी मिसाईल लॉन्चर (Prithvi Missile Launcher), आर्मी ट्रांसपोर्टेशन व्हेईकसल्स आणि रेल्वे तसेच मेट्रो डब्यांचे निर्माण, माइनिंग अँण्ड कंस्ट्रक्शन, डिफेंस आणि एअरोस्पेश या सेक्टर्समध्ये काम करतो. या कंपनीचे बंगळुरु, कोलर गोल्ड फील्ड्स, म्हैसूर, पालक्कड आणि चिकमंगलुरु येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.
दरम्यान, बीईएमएल या कंपनीतील 26 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्यामुळे या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1406.25 रुपये आहे.
मोठी बातमी : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, शिवसेना आमदारांना व्हिप जारी https://t.co/hIUEmVFj60 @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSena @BJP4Maharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks #Vidhansabha #AssemblySpeaker #Shivsena #BJP #NCP #Congress
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
इतर बातम्या :
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा! गुगल 10 लाख भारतीय ग्रामीण महिला उद्योजकांना करणार मदत
HDFC Bank महिला उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास करणार मदत; स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच
रोजी-रोटी धोक्यात, मार्ग काढा, Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांचं थेट PM मोदींकडे आर्जव
(central government is going to sell 26 percent stake of BEML company)