Gold Demand : सरकारचा एक निर्णय आणि सराफा बाजाराला मिळाले जीवदान; सोने झाले स्वस्त, ग्राहकांच्या खरेदीसाठी पडल्या उड्या

Gold Demand Hike : नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात करण्यात आली. या निर्णयाने सोने आणि चांदीत घसरण झाली. विक्री वाढल्याने सराफा बाजारात मोठी उलाढाल झाली.

Gold Demand : सरकारचा एक निर्णय आणि सराफा बाजाराला मिळाले जीवदान; सोने झाले स्वस्त, ग्राहकांच्या खरेदीसाठी पडल्या उड्या
एका निर्णयाने सराफा बाजाराला जीवदान
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 9:58 AM

सोन्याच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यात चढउतार दिसून आला. नरेंद्र मोदी 3.0 च्या पहिल्या बजेटमध्ये गेल्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीने सीमा शुल्क कपातीची घोषणा केली. या निर्णयामुळे सोने एकदम स्वस्त झाले. सोन्याची तुफान विक्री झाली. Crisil च्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या विक्रीतून सराफा व्यापाऱ्यांना 22 ते 25 टक्क्यांचा महसूल वाढला.

Custom Duty घटवल्याचा मोठा फायदा

क्रिसिलने ज्वेलर्सच्या महसूलात 22-25 टक्क्यांची वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 2024-25 साठी महसूलाचा अंदाज 17-19 टक्के इतका होता. सरकारच्या एका निर्णयामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. त्याचा मोठा फायदा झाला. पूर्वी सोने आणि चांदीवर 15 टक्के कस्टम ड्युटी लागत होती. आता मौल्यवान धातूवर 6 टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बजेटनंतर सोन्यात मोठी घसरण

सोन्याच्या किंमतीत अर्थसंकल्पानंतर मोठी घसरण दिसत आहे. बजेटच्या दिवशीच सोने 4 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले. त्यानंतर सोन्याच्या घसरणीचे सत्र सुरूच होते. 67 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आला. त्यापूर्वी सोन्याची किंमत 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत पुन्हा उसळी आली. पण सध्या सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा स्वस्तात विक्री होत आहे.

गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,378, 23 कॅरेट 71092, 22 कॅरेट सोने 65,382 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,534 रुपये, 14 कॅरेट सोने 41,756 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 81,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.