Income Tax : मोदी सरकारचा जोरदार फैसला, असा वाचवा टॅक्स, सर्वसामान्यांची बल्ले बल्ले!

Income Tax : नवीन कर पद्धतीत कोणी टॅक्स दाखल करत असाल तर गुंतवणुकीवर कोणतीही कर सवलत मिळत नाही. पण जर जुन्या कर पद्धतीने कर विवरण दाखल करणार असाल तर करपात्र कमाईवर कर सवलत मिळते. कर बचतीसाठी सरकारने अनेक पर्याय दिले आहेत.

Income Tax : मोदी सरकारचा जोरदार फैसला, असा वाचवा टॅक्स, सर्वसामान्यांची बल्ले बल्ले!
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली : इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची तारीख आता जवळ आली आहे. लवकरच आयकर दाखल करण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. केंद्र सरकारच्यावतीने आयकर वसूल करुन तो लोक कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात येतो. सध्या आयकर दाखल करण्यासाठी दोन व्यवस्था आहेत. नवीन कर पद्धतीत (New Tax Regime) कोणी टॅक्स दाखल करत असाल तर गुंतवणुकीवर कोणतीही कर सवलत मिळत नाही. पण जर जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime) कर विवरण दाखल करणार असाल तर करपात्र कमाईवर कर सवलत मिळते. कर बचतीसाठी (Tax Saving) सरकारने अनेक पर्याय दिले आहेत.

Tax सवलतीचे पर्याय

केंद्र सरकारच्या वतीने करदात्यांना कर सवलत देण्यात येत. पण कोणी नवीन कर पद्धतीने कर जमा करणार असाल तर , गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारच्या कर सवलत मिळत नाही. याशिवाय कोणीही जुन्या कर पद्धतीने कर जमा करत असेल तर त्याला त्याच्य गुंतवणुकीवर कर सवलत मिळविता येते. करपात्र उत्पन्नावर या योजनांच्या माध्यमातून करदात्याला कर सवलतीचा दावा दाखल करता येतो. केंद्र सरकारने नागरिकांना कर बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहे.

हे सुद्धा वाचा

या आहेत बेस्ट स्कीम

आयकर करदात्यांना आयकर कायदाच्या कलम 80C अंतर्गत ईएलएसएस, पीपीएफ, एनपीएस, ईपीएफ, कर सवलतीची मुदत ठेव आणि इतर अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. या गुंतवणुकीवर एका आर्थिक वर्षासाठी 1,50,000 रुपयांपर्यंत कर सवलतीचा दावा दाखल करता येतो. याशिवाय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (NPS) कर बचत करता येते. करदात्यांना कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि अतिरिक्त 50,000 रुपयांच्या कर सवलतीचा दावा करता येतो.

आयकर सवलत

करदाते पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या नावे आरोग्य विम्याच्या आधारे 25,000 रुपयांपर्यंत कर सवलत प्राप्त करु शकतात. करदात्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या आरोग्य खर्चापोटी अतिरिक्त 25,000 रुपयांचा दावा करता येतो. ज्येष्ठ नागरीक दोन्ही श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत दावा दाखल करता येतो.

नवीन कर पद्धतीत सवलत

New Tax Regime अंतर्गत वेतन आणि पेन्शन उत्पन्नातून 50,000 रुपयांची मानक वजावट (Standard Deduction) देण्याचा प्रस्ताव आहे. वेतनदार आणि निवृत्तीवेतनधारकाला याविषयीचा दावा करता येईल. वेतन आणि पेन्शनमधून 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन करता येईल. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. नवीन कर पद्धतीने कर भरतानाच त्याचा पर्याय असेल. कुटुंबाच्या निवृत्तीत 15,000 रुपयांच्या मानक वजावटीचा प्रस्ताव त्या निवृत्तीधारकांसाठी असेल, ज्यांनी नवीन कर व्यवस्थेची निवड केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.